"हे" पाच जिल्हे कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरात पिछाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

राज्यात सध्या कोरोना संसर्गाच्या रुग्णावर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहे. मात्र, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. राज्यात सर्वाधिक रिकव्हरी रेट हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे.

सोलापूर : राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात (रिकव्हरी रेट) वाशिम, ठाणे, नंदूरबार, पालघर व सोलापूर हे पाच जिल्हे राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहेत. तर सर्वाधिक बरे होण्याचा दर कोल्हापूरचा आहे. राज्यातील 30 जिल्हे राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक रिकव्हरी रेट असलेले आहेत. 

हेही वाचाः सोलापूर शहरात देशी दारू विक्रीला परवानगी द्या 

राज्यात सध्या कोरोना संसर्गाच्या रुग्णावर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहे. मात्र, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. राज्यात सर्वाधिक रिकव्हरी रेट हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. आरोग्य खात्याने या रिकव्हरी रेटबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. 
त्यात कोल्हापूर (90.4), परभणी (87.1), हिंगोली (84.9), वर्धा (78.6), गडचिरोली (78.0), सिंधुदूर्ग (77.3), चंद्रपूर (75.9), नगर (74.6), उस्मानाबाद (73.9), बीड (69.9), सातारा (69.5), यवतमाळ (69.1), गोंदिया (68.3), रत्नागिरी (66.7), धुळे (65.8), भंडारा (65.3), बुलढाणा (65), लातूर (64.1), अकोला (63.7), जालना (63.3), अमरावती (63), नागपूर (62.9), नांदेड (62.1), रायगड (60.9), औरंगाबाद (55.3), नाशिक (55.2), सांगली (54.5), पुणे (54.3), जळगाव (52.6), मुंबई (50.4), सोलापूर (46.7), नंदूरबार (43.4), ठाणे (39.3), पालघर (30.9), वाशिम (23.9). राज्याचा एकूण कोविड रुग्णांचा बरे होणाचा दर 49.8 आहे. 

हेही वाचाः श्री विठ्ठल रुक्‍मिणी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण 

सध्या सर्वात कमी रिकव्हरी रेट असलेल्या जिल्ह्यात वाशिम, पालघर, ठाणे, नंदूरबार व सोलापूर हे आहेत. राज्याच्या सरासरी रिकव्हरी दराच्या खाली हे पाच जिल्हे आहे. निदान हे जिल्हे राज्याच्या आकडेवारीशी जुळते होतील या पद्धतीने प्रयत्न केले जावेत असे खात्याचे म्हणणे आहे. सर्वाधिक रिकव्हरी रेट असलेल्या जिल्ह्यात कोल्हापूर, परभणी, हिंगोली, वर्धा व गडचिरोली जिल्हे आहेत. होम क्वारंटाइन केलेल्या संशयितांना 17 दिवस पूर्ण होताच कोविड नसल्याची खात्री करून बरे झाल्याचे घोषित करावे, अशी सूचना आरोग्य खात्याने दिली आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These five districts are lowest in recovery rate of corona patients