नक्षत्र वनाच्या माध्यमातून "ते" करत आहेत वृक्ष संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 27 जून 2020

श्री.कोडगीरवार यांनी बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर घराच्या परिसरात बाग फुलवण्यास सुरुवात केली. त्यांना झाडे लावण्याची आवड अगदी लहानपणापासून होती. त्यांनी नक्षत्रवन या ंसंकल्पनेचा अभ्यास सुरू केला. अवकाशात असलेली 27 नक्षत्रे व त्यांचे महत्त्व जाणून घेताना झाडांशी असलेला नवा पैलू त्यांना सापडला. प्रत्येक नक्षत्राशी एका झाडाची ओळख जोडलेली आहे. याप्रमाणे बकुळ, वड, पिंपळ अशी 27 प्रकारची भारतीय झाडे आहेत.

सोलापूर:  नक्षत्र वनाच्या माध्यमातून संस्कृतीचे झाडांशी असलेले नाते समजून सांगण्यासाठी अनेक दुर्मीळ झाडांची जोपासना करण्याचे काम शहरातील माशाळनगर भागातील चंद्रकांत कोडगीरवार करत आहेत. 

हेही वाचाः बॅंक अधिकाऱ्याने काढली परस्पर रक्कम, सांगोला तालुक्‍यातील घटना 

श्री.कोडगीरवार यांनी बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर घराच्या परिसरात बाग फुलवण्यास सुरुवात केली. त्यांना झाडे लावण्याची आवड अगदी लहानपणापासून होती. त्यांनी नक्षत्रवन या ंसंकल्पनेचा अभ्यास सुरू केला. अवकाशात असलेली 27 नक्षत्रे व त्यांचे महत्त्व जाणून घेताना झाडांशी असलेला नवा पैलू त्यांना सापडला. प्रत्येक नक्षत्राशी एका झाडाची ओळख जोडलेली आहे. याप्रमाणे बकुळ, वड, पिंपळ अशी 27 प्रकारची भारतीय झाडे आहेत. या सर्व झाडांची जोपासना केल्यास नक्षत्रवन ही संकल्पना साकार होते. ही संकल्पना धार्मिक नसून ती वृक्ष संगोपनाची आहे, हे त्यांनी अभ्यासाद्वारे जाणले. या झाडांच्या औषधी उपयोगाचा अभ्यास केला. ज्योतिषशास्त्र व निसर्गोपचारामध्ये या झाडांचा नेमका काय संदर्भ असेल, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याचेही शिक्षण घेतले. या झाडांच्या औषधी उपयोगाचे महत्त्व जाणले तर अशा प्रकारच्या नक्षत्र वनातून भारतीय औषधी शास्त्राचा विकास पाहण्यास मिळतो. प्रत्येक झाडाचे औषधी उपयोग अत्यंत वेगवेगळे आहेत. पाने, फुले, फळे या तिन्ही घटकांचा औषधी उपयोग होतो. 

हेही वाचाः गृहमंत्र्याकडून पोलिस सदनिका व निवास प्रकल्प मंजुरीची अपेक्षा 

पण, यापैकी अनेक झाडे ही वृक्ष असल्याने छोट्याशा जागेत वाढवणे अशक्‍य होते. तेव्हा त्यांनी कुंडीत ही झाडे लावून दरवर्षी माती बदलणे व मुळ्या कापून ती लहान आकारात ठेवली. नक्षत्र वनाचा अभ्यास पाहून त्यांच्याकडे काही संस्थांनी नक्षत्रवनातील रोपे मागवून घेतली. यासोबत दुर्मीळ प्रकारची झाडे देशभरातील अनेक भागांतून गोळा केली. 
त्यांनी गडचिरोलीत आढळणाऱ्या माटोळ या औषधी झाडाचे संगोपन केले आहे. नक्षत्रवन अभ्यासक म्हणून ते मार्गदर्शकाचे काम करतात. 

संरक्षक भिंतीवर देखील लावली झाडे 
दोन घरांच्या मध्ये संरक्षक भिंत असते. त्याचा उपयोग देखील श्री. कोडगीरवार यांनी झाडे लावण्यासाठी केला आहे. या भिंतीवर रांगेने कुंड्या ठेवून त्यामध्ये झाडे लावली आहेत. या भिंतीवर असलेल्या जागेचा परिपूर्ण उपयोग त्यांनी केला आहे. या भिंतीमुळे त्यांच्या व शेजारच्या घरांना शोभा आली आहे. 

ही तर निसर्गाची परतफेड 
झाडे आपल्याला ऑक्‍सिजन देतात. जेव्हा दवाखान्यात आपण ऑक्‍सिजन घेतो तेव्हा त्याची किमंत मोजावी लागते. झाडाकडून आपण ऑक्‍सिजन मिळवतो. मग निसर्गाच्या मदतीची परतफेड करण्याच्या प्रेरणेने हे काम करीत आहे. 
- चंद्रकांत कोडगिरवार, माशाळ नगर सोलापूर.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They are trying to cultivate tree culture through the Nakshatra forest