महापालिका प्रशासन विरुद्ध कारखानदारांच्या संघर्षानंतर ‘हा’ उद्योग सुरु : Video

Thies industry started after the struggle of the manufacturers against the municipal administration
Thies industry started after the struggle of the manufacturers against the municipal administration

सोलापूर (सोलापूर) : लॉकडाउनमुळे तीन महिन्यांपासून शहरातील विडी कारखाने बंद आहेत. मात्र, प्रशासनाने घालून दिलेल्या सुरक्षा नियमांच्या अधीन राहून मंगळवारी काही कारखाने सुरू झाले. या कारखान्यांमध्ये सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानुसार कामगारांना पान-तंबाखूचे वितरण करण्यात आले. 
लॉकडाउन शिथिलीकरणानंतर विडी उद्योगाला पुन्हा प्रारंभ होण्यासाठी परवानगी देताना महापालिका आयुक्तांनी जाचक अटी लादल्यानंतर प्रशासन विरुद्ध कारखानदार व कामगार संघटना असा संघर्ष सुरू होता. शेवटी शनिवारी रात्री उशिरा महापालिका आयुक्तांनी उद्योजक व कामगारांसाठी अनुकूल नवीन सुधारित आदेश काढल्याने विडी उद्योगाला प्रत्यक्षात आजपासून (मंगळवार) सुरवात झाली आहे. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहरात एकूण 14 विडी कंपन्यांच्या 138 ब्रॅंचेस आहेत. त्यापैकी काही ब्रॅंचबाबत कंटेन्मेंट झोनचा तिढा सुटला नाही. सुरक्षा साधनांसह पूर्ण तयारी झालेल्या देसाई ब्रदर्स व लंगर विडी या कंपन्यांच्या प्रत्येकी चार अशा आठ ब्रॅंचेसमध्ये कामगारांना पान-तंबाखूचे वाटप करण्यात आले. सकाळी नऊपासूनच कामगार ब्रॅंचसमोर जमले. ब्रॅंचमधील चेकर स्टाफ व व्यवस्थापकांनी कामगारांना कोरोना महामारीविषयी माहिती देऊन घ्यावयाची काळजी व पाळावयाचे नियम आदींची माहिती दिली. 

लंगर विडीचे सहायक व्यवस्थापक देविदास बुगडे म्हणाले, कामगारांसाठी आम्ही सर्व सुरक्षा साधनांची व्यवस्था केली आहे. कामगारांनीही ब्रॅंचमधील अधिकारी सांगतील त्या नियमांचे पालन करावे व ब्रॅंचमधून घरी गेल्यानंतरही हातपाय स्वच्छ धुणे, प्रसंगी अंघोळ करणे, स्वत:सह कुटुंबाच्याही आरोग्याच्या दृष्टीने दक्ष राहावे, याबाबत मार्गदर्शन करत आहोत. कामगार सुरक्षित तर उद्योगही सुरक्षित राहील. 

ब्रॅंचमध्ये असे सुरू होते कामकाज 

  • * ब्रॅंचसमोर गर्दी होऊ नये म्हणून एक कर्मचारी सोशल डिस्टन्सिंगवर देखरेख करत होता 
  • * स्टाफमधील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कामगाराच्या हातावर सॅनिटायझर फवारले 
  • * थर्मल स्कॅनिंग व ऑक्‍सिमीटरने तपासणी करून त्यांची नोंद घेतली 
  • * घरातून आणलेल्या कामगारांच्या पिशव्यांना बंदी घालून पिशव्या बाहेरच ठेवायला भाग पाडले 
  • * खास कामगारांसाठी कार्ड क्रमांक टाकून तयार ठेवलेल्या कापडी पिशव्यांमधून पान-तंबाखूचे वितरण केले 
  • * कामगारांना जाताना घरी घ्यावयाची काळजी व आयुर्वेदिक काढ्याची माहिती दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com