Breaking ! बंगळूर-अहमदाबाद एक्‍स्प्रेसवर दरोडा; प्रवाशांचे पन्नास तोळे दागिने लुटले 

विजय थोरात 
Monday, 1 March 2021

बंगळूर-अहमदाबाद एक्‍स्प्रेसवर आज (सोमवारी) पहाटे दरोडा पडला. या दरोड्यात प्रवाशांचे पन्नास तोळे दागिने लुटण्यात आले. तसेच काही प्रवाशांना दरोडेखोरांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

सोलापूर : बंगळूर-अहमदाबाद एक्‍स्प्रेसवर आज (सोमवारी) पहाटे दरोडा पडला. या दरोड्यात प्रवाशांचे पन्नास तोळे दागिने लुटण्यात आले. तसेच काही प्रवाशांना दरोडेखोरांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी बंगळूर - अहमदाबाद एक्‍स्प्रेसमध्ये सोमवारी (ता. 1) पहाटेच्या सुमारास सोलापूर - कर्नाटक सीमा भागातील बोरोटी ते नागणसूर (ता) दुधनी, जिल्हा सोलापूर) या भागात ही घटना घडली आहे. या घटनेत प्रवाशांचे 50 तोळे दागिने लुटल्याची तक्रार प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांत केली आहे. 

बंगळूर - अहमदाबाद एक्‍स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराबाबत प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर प्रवाशांना मारहाण देखील करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रवाशांनी सांगितली आहे. घडलेल्या प्रकाराची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves robbed the Bangalore to Ahmedabad Express and stole jewelery