सकाळ ब्रेकिंग ! सोलापुरातील ठोंगेवाडी क्‍वारंटाइन 

तात्या लांडगे
बुधवार, 8 एप्रिल 2020

ठळक बाबी... 

  • मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील कोरोनाबाधित वास्तव्यास होता ठोंगेवाडीत 
  • ठोंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील बेदाणा कारखान्यात होता तरुण कामाला 
  • सीमाबंदी असतानाही तरुण ग्वाल्हेरला कसा गेला : यात दोषी कोण 
  • बेदाणा कारखान्यावरील 35 लोक घेतले ताब्यात : वैद्यकीय तपाणीसाठी घेतले नमुने 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वांगीजवळील ठेंगेवाडी येथील बेदाणा कारखान्यावर काम करणारा मध्यप्रेदशातील कामगार 31 मार्चला ग्वाल्हेरला परतला आहे. 6 एप्रिलला तो त्याठिकाणी कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे सोलापुरात कोणताही कोरोनाबाधित रुग्ण नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. तर ठोंगेवाडी सील केल्याचेही ते म्हणाले. 

हेही नक्‍की वाचा : सोलापुरकरांनो घाबरु नका ! सोलापूर आहे कोरोनापासून कोसो दूर 

सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत पडताळणी केलेले सर्व संशयीतांचे नमुने निगेटिव्ह आढळलेले आहेत. सोलापूर अद्यापही कोरोनापासून दूर असून नागरिकांनी त्यासाठी मोलाचे सहकार्य करीत खबरदारी घेतली आहे. दक्षिण सोलापुरातील वांगीजवळील ठेंगेवाडी येथील बेदाणा कारखान्यावर तो तरुण कामाला होता. तो 31 मार्चला गावी परतला असून त्याठिकाणी तो पॉझिटिव्ह आढळला आहे. सोलापुरात अद्यापही एकही रुग्ण नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खबरदारी म्हणून ठोंगेवाडी सील करुन त्याठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्‍त केल्याचेही त्यांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री म्हणाले... 

ठेंगेवाडीत वैद्यकीय पथकाची नियुक्‍ती 
वांगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील ठेंगेवाडी येथील बेदाणा कारखान्यावर काम करणारा तरुण लॉकडाउननंतर 31 मार्चला वाहनाने मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरला परतला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या बेदाणा कारखान्यावरील 35 जणांना ताब्यात घेतले असून त्यांचे नमुने पडताळणीसाठी घेण्यात आले आहेत. तर ठेंगेवाडी संपूर्णपणे सील केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सकाळ शी बोलताना दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्याठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्‍त केल्याचेही त्यांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : लॉकडाउनमधील आमदारांच्या वेतनाला कात्री 

सीमाबंदी असतानाही तो निसटला कसा 
कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 22 मार्च रोजी लॉकडाउन जाहीर केले. कोणत्याही जिल्ह्यातील तथा परराज्यातील नागरिक इतरत्र ये-जा करणार नाहीत, याची दक्षता म्हणून सीमाबंदीही करण्यात आली. जागोजागी पोलिस बंदोस्त तैनात करण्यात आला, नाकाबंदीचे पॉईंट ठरवून त्याठिकाणी स्वतंत्र पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली. मात्र, सोलापुरातील बेदाणा कारखान्यात कामाला असलेला तो मजूर सीमाबंदीतही ग्वाल्हेरला पोहचलाच कसा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याची माहिती संकलित करुन त्या प्रत्येकाची पडताळणी होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : ब्रेकिंग ! आयुष्यमान भारत योजनेतील दवाखान्यांना टाळे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thongwadi quarantine in south Solapur