esakal | सोलापूरच्या विडी उद्योगाचा तिढा सुटण्याच्या दिशेने 
sakal

बोलून बातमी शोधा

Bidi worker

गेल्या आठवड्यापासून विडी उद्योगाबाबत महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्णयावरून मोठे वादंग सुरू आहे. विडी उद्योजक आयुक्तांचा निर्णय अमान्य करत विडी कारखाने सुरू न करण्याच्या निर्धारावर ठाम आहेत. जर दिलेल्या निर्णयानुसार विडी कारखाने सुरू न केल्यास कारखानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी शनिवारी दिला होता. 

सोलापूरच्या विडी उद्योगाचा तिढा सुटण्याच्या दिशेने 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गेल्या आठवड्यापासून विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्णयावरून मोठे वादंग सुरू आहे. विडी उद्योजक आयुक्तांचा निर्णय अमान्य करत विडी कारखाने सुरू न करण्याच्या निर्धारावर ठाम आहेत. कामगार संघटनाही आयुक्‍तांच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. जर दिलेल्या निर्णयानुसार विडी कारखाने सुरू न केल्यास कारखानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी शनिवारी दिला होता. हा तिढा वाढत असताना सोमवारी विभागीय आयुक्तांनी प्रशासनाबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याने आता पुढील सकारात्मक निर्णयाकडे कारखानदारांचे लक्ष लागले आहे. एकूणच विडी उद्योगाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. 

हेही वाचा : ...वाट बघतोय रिक्षावाला! 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यात महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सहाय्यक कामगार आयुक्त नीलेश येलगुंडे, सोलापूर विडी उद्योग संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश तिवाडी, प्रवक्ते बाळासाहेब जगदाळे, ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम आदींचा सहभाग होता. या वेळी श्री. म्हैसेकर यांनी उपस्थितांना विचारले, की कामगारांच्या घरी जाऊन विड्या घेण्यामध्ये काय अडचणी आहेत. यावर श्री. आडम यांनी कामगारांची बाजू मांडली. त्यांनी, कामगार गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगारीमुळे उपाशी आहेत. त्यांच्या हाताला काम हवे आहे. कामगारांच्या घरापर्यंत जाऊन विड्या घेणे व कच्चा माल देणे जिकिरीचे आहे. बाजारात हाजारोंच्या संख्येने गर्दी होत आहे तेव्हा महिलांना कोरोना होणार नाही का? कारखानदारांकडून सुरक्षिततेची जबाबदारी देऊन पूर्वीप्रमाणे ब्रॅंचमध्येच विड्या घेणे सर्वांसाठी हिताचे ठरेल, हे समजावून सांगितले. तसेच विडी कामगारांना तीन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. 

हेही वाचा : सोलापूरला होणार चार दिवसांआड पाणीपुरवठा 

कारखानदारांची बाजू मांडताना श्री. जगदाळे यांनी, कामगारांची संख्या, शहरातील त्यांचा विस्तार, परिसर आदी पाहता घरोघरी जाऊन विड्या गोळा करणे शक्‍य नाही. कामगारांच्या सुरक्षेची आम्ही काळजी घेऊ, मात्र कामगारांना ब्रॅंचमध्येच पूर्वीप्रमाणे विड्या घेणे व कच्चा माल दिल्यास कामगार व कारखानदारांच्या दृष्टीने सुरक्षित राहील, अशी विनंती केली. यावर श्री. म्हैसेकर यांनी प्रशासनाशी बोलून निर्णय कळवतो, असे आश्‍वासन दिले. 
एक-दोन दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्‍यता असून, प्रशासनाने निदान चर्चा केल्याने सकारात्मक मार्ग निघेल, अशी आशा श्री. जगदाळे यांनी व्यक्त केली.

go to top