esakal | ‘ती’च्यासाठी चक्क रेल्वेची वेळ वाढवण्याची अधिकाऱ्यांनी केली सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Train took 1236 passengers from Solapur district

रेल्वे स्थानकावरून गाडी सुटण्याची वेळ झालेली असताना अचानक समोरील रूळावरून एक महिला तिच्या तान्ह्याबाळाला पदराखाली झाकून धावत निघाली. तातडीने सर्व यंत्रणा हलली अन्‌ अधिकाऱ्यांनी रेल्वेची वेळ झाल्याने वाढवून घेण्याची सूचना केली. अखेर त्या मातेला तिचे गाव गाठण्याचे स्वप्न केवळ काही सेकंदाच्या फरकाने पूर्ण करता आले.

‘ती’च्यासाठी चक्क रेल्वेची वेळ वाढवण्याची अधिकाऱ्यांनी केली सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील रेल्वे स्थानकावरून गाडी सुटण्याची वेळ झालेली असताना अचानक समोरील रूळावरून एक महिला तिच्या तान्ह्याबाळाला पदराखाली झाकून धावत निघाली. तातडीने सर्व यंत्रणा हलली अन्‌ अधिकाऱ्यांनी रेल्वेची वेळ झाल्याने वाढवून घेण्याची सूचना केली. अखेर त्या मातेला तिचे गाव गाठण्याचे स्वप्न केवळ काही सेकंदाच्या फरकाने पूर्ण करता आले. 

हेही वाचा : अन्यथा जेथून आलात तेथे पाठवण्यात येईल 
सोलापूर येथील रेल्वे स्थानकावरून मध्य प्रदेशातील परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे रविवारी (ता. 17) दुपारी २ वाजता रवाना झाली. एकूण एक हजार236 मजुरांना त्यांच्या गावाकडे पाठवण्यात आले. येथील जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वेच्या मदतीने मध्य प्रदेशातील मजुरांना त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी उपलब्ध करून देण्यात आली. या रेल्वेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने मध्य प्रदेशातील मजुरांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य तपासणी केली. एकूण एक हजार 236 मजुरांची नोंदणी झाली होती. यात बार्शी 42, पोलिस आयुक्त 95, सोलापूर मनपा 38, दक्षिण सोलापूर 95,पंढरपूर 134, मोहोळ 123, माढा 117, करमाळा पाच, मंगळवेढा 55, सांगोला 158, माळशिरस 35 एवढ्या नागरिकांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून एकूण 270 परप्रांतीयांना सात एसटी बसद्वारे रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. नंतर या सर्व प्रवाशांची कागदपत्राची तपासणी करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी थर्मल स्क्रीनिंग तपासणी पूर्ण केली. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सर्व प्रवाशांना जेवणाची पाकिटे देण्यात आली. सकाळी आठ वाजल्यापासून हे प्रवासी स्थानकावर दाखल झाले होते. त्यांना रांगेत थांबवण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे खात्याने या प्रवाशांना प्लॅटफार्मवर नेऊन तिकिटे उपलब्ध करून दिली. राज्य शासनाने या प्रवाशांच्या तिकिटाचा खर्च उचलला होता. एकूण आठ लाख रुपये खर्च तिकिटासाठी झाला. 
अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलिस उपायुक्त वैशाली कुर्डूकर, एसीपी प्रीती टीपरे, प्रांत अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार श्री. कुंभार, रेल्वे स्थानकाचे संचालक जी. एन. मीना, स्टेशन मास्टर एस. के. सिंग यांच्यासह रेल्वे, महसूल व आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाडी सुटण्याची वेळ झाली असल्याने गाडीने हिरवा झेंडा दाखवला. तेवढ्यात रूळावरून एक महिला बाळाला हातात घेऊन पळत आली. एका हातात कागदपत्रे व दुसऱ्या हातात बाळ घेऊन ती येत होती. तेव्हा तेथे असलेल्या एका व्यक्तीने पळत जाऊन तिच्या हातातील बाळ हातात घेऊन त्यांना स्थानकावर पोचवण्यास मदत केली. अधिकाऱ्यांनी गाडी जास्त वेळ थांबवून तिला गाडीत बसवले. गाडीत बसल्यानंतर या मातेने कपाळावरील घाम पुसत गावाकडे जाण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद व्यक्त केला.

go to top