अक्कलकोटमध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी बंदची जय्यत तयारी 

राजशेखर चौधरी
Sunday, 20 September 2020

सोमवार, ता.21 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हा बंद करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण अक्कलकोट तालुकाही शंभर टक्के बंद करण्यात येणार असल्याने आज आयोजित तालुक्‍यातील सर्वपक्षीय, सामाजिक संघटना यांच्यावतीने आयोजित बैठकीप्रसंगी संजय देशमुख हे बोलत होते. 

अक्कलकोट(सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संसदेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेत कायदा करुन तो राष्ट्रपतीकडे मंजूरीकरिता पाठवून द्यावेत, असे आवाहन अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी केले. 

हेही वाचाः पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 350 नागरिकांना आरोग्य विमा कार्डचे वाटप 

सोमवार, ता.21 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हा बंद करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण अक्कलकोट तालुकाही शंभर टक्के बंद करण्यात येणार असल्याने आज आयोजित तालुक्‍यातील सर्वपक्षीय, सामाजिक संघटना यांच्यावतीने आयोजित बैठकीप्रसंगी संजय देशमुख हे बोलत होते. 

हेही वाचाः 500 मेंढ्या मारताहेत जुळे सोलापुरातील गवतावर ताव ! कळपासह 25 मेंढपाळाचा लवाजमा 

याप्रसंगी सुरेशचंद्र सुर्यवंशी,महेश इंगळे,अमोलराजे भोसले, मिलन कल्याणशेट्टी,रामचंद्र समाणे विकास मोरे, सुभाष पुजारी, बाबासाहेब निंबाळकर,मुबारक कोरबु, सद्दाम शेरीकर, अरुण जाधव, अप्पू पराणे, निखिल पाटील, सुनिल गवंडी, बाळा शिंदे, मनोज निकम, प्रविण घाटगे, विजय माने, अमिन मुजावर, धर्मा गुंजले, माणिक बिराजदार, सतिष शिरसट, छोटू पवार आदीजण उपस्थित होते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले. रिपाइं (आ)चे अविनाश मडिखांबे,रासप जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, लहुजी शक्तीसेनेचे वसंत देडे, कॉंग्रेस विधानसभा युवक अध्यक्ष बाबा पाटील,मुस्लीम समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष एजाज मुतवल्ली, वडार समाजाचे तालुका अध्यक्ष अंकुश चौगुले,लिंगायत समाजाचे 
महेश हिंडोळे आदींनी मराठा समाजाचा शैक्षणिक, सामाजिक आरक्षण दिलेच पाहिजे असे सांगून शेवटी जनतेकरिता सरकार, प्रशासन असते, त्यामुळे आरक्षण मराठा समाजाला मिळालेच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली.यावेळी प्रशांत भगरे,प्रविण घाटगे, सतिश शिरसट, वैभव नवले, गणेश भोसले, प्रथमेश पवार, संजय गोंडाळ, गोविंदराव शिंदे, मनोज गंगणे, योगेश पवार, मंगेश फुटाणे, ज्ञानेश्वर भोसले, सिध्दाराम टाके, नितीन शिंदे, राम मातोळे, मनोज इंगोले, नागराज पाटील, रवि कदम, डॉ.बसवराज बिरजादार, संकेत शिरसट, सागर गोंडाळ यांच्यासह शेकडो मराठा समाजातील युवक उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब निंबाळकर यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचलन प्रकाश सुरवसे व आभात योगेश पवार यांनी मानले.  

 

संपादनः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Triumphant preparation of bandh for demand of Maratha community reservation in Akkalkot