हे तुळशी माते.... आता उठून भक्तांचे रक्षण कर 

शाम जोशी
Friday, 27 November 2020

ज्‌याचिये द्वारी तुळसी वृंदावन । धन्य ते सदन वैष्णवांचे।। अशा शब्दांत संत एकनाथांनी वर्णन केलेल्या तुळसीचा विवाहसोहळा कार्तिकी द्वादशीपासून पौर्णिमेपर्यत आपापल्या सोयीने केला जातो. आज शहर व जिल्ह्यात घरोघरी तुळशीविवाह करण्यात आले. 

द. सोलापूर(सोलापूर) ः दिपोत्सवाचा झगमगाट, फटाक्‍यांची आतषबाजी अन मंगलष्टकांसह मंत्रोपचारांच्या निनादात सहा महिने झोपली होतीस आता उठून भक्तांचं रक्षण कर अशी साद घालत आज (ता.27) शहर व जिल्ह्यात घरोघरी तुळसीविवाह संपन्न झाला. हा विधी कार्तिकी पौर्णिमेपर्यंत करण्याचा प्रघात आहे. 

हेही वाचाः हलगी वाजवून जप्तीची कारवाई ; सिध्देश्‍वरने दिला 36 लाखांचा धनादेश 

ज्‌याचिये द्वारी तुळसी वृंदावन । धन्य ते सदन वैष्णवांचे।। अशा शब्दांत संत एकनाथांनी वर्णन केलेल्या तुळसीचा विवाहसोहळा कार्तिकी द्वादशीपासून पौर्णिमेपर्यत आपापल्या सोयीने केला जातो. आज शहर व जिल्ह्यात घरोघरी तुळशीविवाह करण्यात आले. 

हेही वाचाः आमदार भालके यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या बंधूनी घातले विठ्ठलाला साकडे 

त्यासाठी अंगणात व वृंदावनासमोर रांगोळी काढण्यात आली होती. तुळशी वृदांवनाला रंगरंगोटी करुन सजवले होते. वृंदावनामधे चिंच, बोरे, आवळा यासह अन्य फळांची मांडणी केली होती. वृंदावनाशेजारी ऊस ठेवून दिपोत्सवाद्वारे वृंदावनास झगमगाट केला होता. तुळशीला बांगड्या, मंगळसूत्र, जोडवे यासह सौभाग्यलेणे अर्पण करुन बाळकृष्णाच्या मूर्तीसह तिचा प्रतिमात्मक विवाह लावला गेला. यावेळी तुळशी व कृष्णाच्या मूर्तीची श्रीसूक्त व पुरुषसुक्त याद्वारे अभिषेकादि पूजन केले . स्वस्तिश्री गणनायकंम गजमुखंम...यासह तदेव लग्नंम ...या मंगलष्टाक गायनाद्वारे अक्षता टाकून हा विवाहविधी घरोघरी संपन्न झाला. यावेळी तुळशीला हलवुन "सहा महिने झोपली होतीस, आता उठून भक्तांचं रक्षण कर" अशी साद घालण्यात आली. महारती व प्रसाद वाटप होऊन फाटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. यानिमित्त घरातील सर्व सदस्यांसह नातेवाईक व शेजारी मंडळींनी फराळाचाही आस्वाद घेतला. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Tulsi mother .... now get up and protect the devotees