त्यांच्या आठवणीचा हिरवागार बहर झालाय पंचवीस वर्षाचा

smrut1.jpg
smrut1.jpg

सोलापूर: शहरातील कंबर तलावाजवळ असलेल्या सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या परिसरात स्मृतिवनामध्ये सामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या स्मृती व वाढदिनानिमित्त लावलेली झाडांनी हा परिसर बहरला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण 1 हजार 300 झाडे बहरली आहेत. हा स्मृतिवनाचा उपक्रम आता रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. 

स्मृतिवनाची संकल्पना- एखादा व्यक्तीची स्मृती किंवा वाढदिवसाची आठवण असावी यासाठी वृक्षारोपण करण्यात येते. सामाजिक वनीकरण विभागाच्या जागेमध्ये हे स्मृतिवन तयार करण्यात आले आहे. 1996 मध्ये ही संकल्पना प्रत्यक्षात आली. या ठिकाणी लावलेल्या झाडामध्ये पिंपळ, वड, चाफा, आंबा, उंबर, लिंब, गुलमोहर आदींचा समावेश आहे. 
सामाजिक वनीकरण खात्याने त्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेत वर्षभर नागरिक व संस्था पदाधिकारी वृक्षारोपणासाठी येत असतात. 

या ठिकाणी अनेक नामवंत व्यक्तींच्या स्मृतीनिमित्त लावलेली झाडे आता मोठी झाली आहेत. नव्वदच्या दशकात लावलेली झाडे आता मोठी झाली आहेत. 
1997 मध्ये सोलापूर शहरात भरलेल्या राज्य पक्षीमित्र संमेलनाची आठवण म्हणून लावलेले वडाचे झाड मोठे झाले आहे. व्यक्तींसोबत शहरातील अनेक मोठ्या कार्यक्रमांची स्मृती या ठिकाणी झाडाच्या रूपात जपली आहे. झाडांच्या ठिकाणी वृक्षारोपणाचा तपशील असलेला फलक लावला जातो. ही झाडे लावण्यासाठी सामाजिक वनीकरणाच्या बॅंक खात्यात एक हजार रुपये नागरिक भरतात. हा निधी बॅंकेत जमा असून अधिकाऱ्यांची समिती या निधीचे नियंत्रण करते. आतापर्यंत हा निधी जमा असून समितीच्या निर्णयानुसार त्याचा उपयोग एखाद्या चांगल्या उपक्रमासाठी केला जाणार आहे. हे स्मृतिवन फार मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. वनीकरण कार्यालयाच्या परिसरात सर्वत्र ही झाडे वाढलेली दिसतात. या झाडांची देखभाल वनीकरण खात्याकडून केली जाते. 


वृक्ष चळवळीला चालना
स्मृतिवनाच्या उपक्रमातून अनेक नागरिक वृक्ष चळवळीशी जोडले गेले आहेत. या वृक्षारोपणामुळे हा परिसर हिरवागार झाला आहे. 
- सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी, सोलापूर 

नागरिक व संस्थाचा सहभाग 
मागील काही वर्षांपासून नागरिक स्मृतिदिन व वाढदिनानिमित्त झाडे लावण्यासाठी स्मृतिवनामध्ये येत असतात. या उपक्रमाने आता रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. 
- तुकाराम जाधव, वनक्षेत्रपाल सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com