NateputeGP
NateputeGP

Gram Panchayat Results : माळशिरसच्या भांबमधील दोन उमेदवार चिठ्ठीद्वारे विजयी घोषित ! मोरोचीमध्ये तरुणांची सरशी 

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज माळशिरस येथील म्हसवड रोडवरील शासकीय गोदामात सकाळी साडेआठ पासून सुरू आहे. शेंडेचिंच आणि येळीव या ग्रामपंचायतीचा निकाल सर्वप्रथम लागलेला आहे. साडेदहा वाजेपर्यंत ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून अतिशय शांततेत ही प्रक्रिया सुरू आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील भांब येथील प्रभाग क्रमांक तीनमधील काळे देवकाबाई नारायण, काळे संगीता बाळू यांना समान 209 मते मिळाली आहेत. त्यामधून चिठ्ठीद्वारे संगीता बाळू काळे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तसेच बिजवडी येथील रसिका बाळासाहेब भोरे व बालिका विकास शिंदे यांनाही समान 125 मध्ये मिळाली आहेत, चिठ्ठीद्वारे रसिका भोरे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. 

पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ यांच्या नेतृत्वाखालील मोरोची ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले आहे. मोरोची ग्रामपंचायतीमध्ये तरुणांच्या मोरजाई परिवर्तन विकास आघाडीला 13 पैकी 13 जागा मिळाल्या आहेत. या तरुणांचे नेतृत्व रासपचे रणजित सुळ, भाजपचे शुभम सुळ, दत्ता साळुंखे आदींनी केले होते. 

या विजयावर शुभम सुळ "सकाळ'शी बोलताना म्हणाले, मतदारांनी भ्रष्टाचार व अन्यायाविरुद्ध मतदान केले आहे. आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे पारदर्शीपणा व सर्वांना विश्वासात घेऊन काम करू. 

मोरोचीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप चव्हाण यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com