`या` शहरातील समांतर जलवाहिनीच्या सीमांकनाचे काम पूर्ण 

`या` शहरातील समांतर जलवाहिनीच्या सीमांकनाचे काम पूर्ण 

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उजनी ते सोलापूरदरम्यान टाकण्यात येणाऱ्या समांतर जलवाहिनीच्या सीमांकनाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा कृती आराखडा मंजुरीसाठी आयआयटीकडे पाठविण्यात आला आहे. 

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व सक्षम होण्यासाठी उजनी जलाशय परिसरात पंपहाउस आणि जॅकवेल उभारण्यात यावे. त्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने 0.25 एकर जागा तातडीने महापालिकेस उपलब्ध करून द्यावी. तसेच 15 दिवसांत 110 किलोमीटरचे सीमांकन पूर्ण करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 फेब्रुवारी रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार सीमांकनाचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आराखड्याला मंजुरी मिळाली की भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरवात होणार आहे. 

उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी 110 किलोमीटरचे सीमांकनाचे काम पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. या पाणीपुरवठा योजनेसाठी शासन आवश्‍यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार आहे. या योजनेसाठी भूमिगत जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्या वेळी शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई दिली जाणार आहे. ही योजना दोन टप्प्यांत राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 110 दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वितरण व्यवस्था सुधारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 464 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com