विद्यापीठाचं ठरलं ! विद्यार्थ्यांना परत मिळणार 20 टक्‍के परीक्षा शुल्क

0Test_0.jpg
0Test_0.jpg

सोलापूर : कोरोनामुळे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा शुल्कातील 20 टक्‍के रक्‍कम परत केली जाणार आहे. महाविद्यालयांच्या माध्यमातून ही रक्‍कम विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या या निर्णयाचा सुमारे 18 ते 20 हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

ठळक बाबी...

  • ज्या विद्यार्थ्यांनी अतिविलंब व विलंब शुल्क दिले, त्यांना परत मिळणार रक्‍कम
  • प्रथम व द्वितीय वर्षात जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांनाही मिळणार परीक्षा शुल्कातील 20 टक्‍के रक्‍कम
  • महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती; त्यामुळे रक्‍कम वर्ग करण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविली
  • विद्यापीठातील विद्यार्थ्यांना 20 टक्‍के रक्‍कम संबंधित संकुलातर्फे मिळणार माघारी
  • आगामी सत्र परीक्षा ऑनलाईनच; परीक्षा शुल्क कमी करण्याबाबत विद्यापीठाकडून निर्णय नाहीच

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी जिल्ह्यातील 108 महाविद्यालये संलग्न आहेत. पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी (प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षात) सुमारे 70 ते 75 हजार विद्यार्थी प्रवेशित असतात. कोरोनाच्या संकट काळात या विद्यार्थ्यांची परीक्षा पारंपारिक पध्दतीने घेणे जिकरीचे व अशक्‍य होते. त्यामुळे अंतिम वर्ष वगळता अन्य विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच, त्यांच्या मागील गुणवत्तेवरुन उत्तीर्ण करण्यात आले. या विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्याने, त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे अशी मागणी विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी लावून धरली. त्यानंतर विद्यापीठाने गुणपत्रिकेसह अन्य खर्च कपात करुन सरसकट 20 टक्‍के परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला. आता त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. दुसरीकडे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर 2020 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरताना विलंब व अतिविलंब शुल्क भरले आहे, त्यांनाही विलंबाचे शुल्क परत केले जाणार आहे.

महाविद्यालयांच्या माध्यमातून होणार परीक्षा शुल्क वितरीत
विद्यापीठाच्या द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रविवारी (ता. 24) सुरु होणार आहे. ऑनलाइन परीक्षा असल्याने सुट्टी दिवशीही परीक्षा होतील. जेणेकरुन आगामी शैक्षणिक वर्ष लवकर सुरु करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल, हा हेतू आहे. परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांना 20 टक्केप्रमाणे शुल्क परत दिले जात आहे. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com