रस्ते व कॉर्नरवर विनाकारण कचरा टाकण्याची बेशिस्त ठरतेय त्रासदायक 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 28 October 2020

शहरातील अनेक भागात भागात रस्त्याच्या कॉर्नरवर स्वच्छ जागेवर नागरिक कचरा टाकून अस्वच्छता करत आहेत. महापालिकेची कचरा संकलन यंत्रणा प्रत्येक गल्लीत जाऊन प्रत्येक घरासमोर वाहन नेऊन कचरा संकलन करते. त्यामुळे नागरिकांना बाहेर कचरा टाकावा लागत नाही. तरीही नागरिक चुकीच्या सवयीने दिवसभरात किंवा रात्री विनाकारण कचरा रस्त्यावर टाकतात. 

सोलापूरः शहरामध्ये प्रत्येक घरातून कचरा संकलन केले जात असताना देखील अनेक भागात नागरिक घरातील कचरा गल्ली किंवा रस्त्याच्या कॉर्नरवर आणून टाकत असल्याने एका अर्थाने बेशिस्त व रोगराईला निमंत्रण मिळत आहे. 

हेही वाचाः मुंबई-पुणे-हैदराबाद हाय स्पिड रेल्वे विद्युतीकरण कामाची होणार सुरुवात 

शहरातील अनेक भागात भागात रस्त्याच्या कॉर्नरवर स्वच्छ जागेवर नागरिक कचरा टाकून अस्वच्छता करत आहेत. महापालिकेची कचरा संकलन यंत्रणा प्रत्येक गल्लीत जाऊन प्रत्येक घरासमोर वाहन नेऊन कचरा संकलन करते. त्यामुळे नागरिकांना बाहेर कचरा टाकावा लागत नाही. तरीही नागरिक चुकीच्या सवयीने दिवसभरात किंवा रात्री विनाकारण कचरा रस्त्यावर टाकतात. 

हेही वाचाः पाचशेच्या दंडाएैवजी मास्क द्या ः आम आदमी पार्टीची मागणी मास्कसंबंधी जनजागृती 

भवानी पेठ हा परिसर स्वच्छ होता. तेथे मुळात कोणतीही कचरा कुंडी नव्हती. मागील काही दिवसापासून नागरिक या कॉर्नरला कचरा टाकल्याने या ठिकाणाला कचरा कुंडीचे स्वरूप येत आहे. हा कचरा टाकल्यानंतर महापालिका या ठिकाणी कचरा संकलनाचा पॉईट नसल्याने लवकर कचरा उचलत नाही. कधीतरी जास्त कचरा झाला तर उचलला जातो. हा भाग कचरा उचलल्यानंतर स्वच्छ झाला की पुन्हा त्या ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे नविन कचरा कुंडी नागरिक करत आहेत. 
या कचरा कुंडीमुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या नागरिकांनाच या कचऱ्याचा त्रास होत आहे. मुलाच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक भरपूर पडलेले आहेत. या कचऱ्यात अन्नपदार्थ असतील ते खाण्यासाठी मोकाट प्राणी येतात. तसेच अन्न सडून त्याची दुर्गंधी पसरते. पाऊस झाल्यावर हा कचरा आजूबाजुला पसरतो. कोरोना सारख्या महामारीला तोंड दिल्यानंतर देखील स्वच्छतेच्या बाबतीत चाललेला हा हलगर्जीपणा चुकीचा आहे, असे जागरुक नागरिकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात प्रत्येक घरातून महानगरपालिकेची गाडी कचरा नेत असताना अनावश्‍यकपणे कचरा कुंडी केली जात आहे. कचरा टाकणाऱ्यांकडून दंड वसूली करावी अशी मागणी जागरुक नागरिकांकडून होत आहे.  

शिस्त सर्वानी पाळली पाहिजे

कचरा संकलनाची शिस्त सर्वानी पाळली पाहिजे. तरच आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत

- विजय मन्याल,नागरिक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnecessary littering on roads and corners is annoying