डॉक्‍टरचा धक्‍कादायक माहिती ! पीपीई कीटच्या तुटवड्यामुळे पॅराशूट अन्‌ एचआयव्ही कीटचा वापर

ppe.jpg
ppe.jpg
Updated on
सोलापूर : कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसह नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कामगारांसाठी आवश्‍यक असलेली साधनसामग्री तत्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र, पीपीई कीट उपलब्ध न झाल्याने काही डॉक्‍टरांसह अन्य कर्मचाऱ्यांना पॅराशूट तथा एचआयव्हीबाधित रुग्णांवर उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या कीटचा वापर करावा लागतोय, असा धक्‍कादायक माहिती एका डॉक्‍टराने दिली.


राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने शासकीय दवाखान्यांमध्ये विशेषत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्‍टरांना पीपीई कीट उपलब्ध करुन देणे गरजेचे आहेत. मात्र, राज्य सरकारने केंद्राकडे पीपीई कीटची मागणी करुनही अद्याप पुरेशा प्रमाणात कीट उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे नर्सेस, वॉर्ड बॉय तथा सफाई कामगारांना त्याठिकाणी जाता येत नसल्याचे चित्र यवतमाळसह अन्य जिल्ह्यांमध्ये पहायला मिळत आहे. रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी खबरदारी म्हणून डॉक्‍टरांना पीपीइ कीट घालणे बंधनकारक आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात पीपीई कीट नसल्याने मोजक्‍याच डॉक्‍टरांना त्याठिकाणी जावे लागत आहे. तर सफाई कामगार तथा नर्सेससह अन्य व्यक्‍तींना पॅराशूट तथा एचआयव्ही कीटचा वापर करावा लागतोय, असे एका डॉक्‍टरांने नाव न घेण्याच्या अटीवर स्पष्ट केले. दरम्यान, काही प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध झाल्याची माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. 


पॅराशूट अन्‌ एचआयव्ही कीटचा वापर 
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पीपीई कीटची मागणी केली असून अद्याप कीट उपलब्ध झालेले नाहीत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्‍टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कामगारांना पीपीई कीट कमी पडू लागले आहेत. पीपीई कीटचा तुटवडा असल्याने पॅराशूट व एचआयव्ही रुग्णांवर उपचार करताना वापरले जाणाऱ्या किटचा वापर डॉक्‍टरांना करावा लागतोय, असे उपचार करणाऱ्या एका डॉक्‍टराने नाव न घेण्याच्या अटीवर धक्‍कादायक माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com