esakal | भाजपा स्थापना दिनानिमित्त  शेळगी केंद्रात लसीकरणास सुरवात 

बोलून बातमी शोधा

shelgi lasikaran.jpg

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास अविनाश पाटील, प्रा. नारायण बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, शालन शिंदे, बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, सुरेश पुप्पल, प्रकाश आळगे, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, शेळगी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नफिसा बागवान, डॉ. ज्योती धाराशिवे आदी उपस्थित होते. 

भाजपा स्थापना दिनानिमित्त  शेळगी केंद्रात लसीकरणास सुरवात 
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर  :  भाजपा स्थापना दिनानिमित्त शेळगी येथील आरोग्य केंद्रात लसीकरणची सेवा प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आला. प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या येथे सोय करण्यात आली आहे. 
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमास अविनाश पाटील, प्रा. नारायण बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, शालन शिंदे, बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, सुरेश पुप्पल, प्रकाश आळगे, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, शेळगी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नफिसा बागवान, डॉ. ज्योती धाराशिवे आदी उपस्थित होते. 
यावेळी ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी कोरोना महामारीमध्ये 45 वर्षे वयोगटातील पुढील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. लस घेतली म्हणजे आपल्याला कोरोना होणार नाही हा भ्रम बाजूला ठेवून मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. या लसीकरणाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे यांनी केले. 
यावेळी हेमलता टोणपे, सुवर्णा गोडगे, उषा शेळके, संतोषी नारायणकर, लक्ष्मीकरला वंगा, आरती शेडे, रमेश धनुरे, धरीराज रमणशेट्टी, जयश्री धप्पाधुळे, सरोजा खुब्बा, महेश्री पडशेट्टी, विजयालक्ष्मी पडशेट्टी, रत्नमाला रेड्डी, निलावती स्वामी, सुनिता पसारे, श्रीदेवी देसाई, शोभा गोटे, सिंधू शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. ज्योती धाराशिवे यांनी सूत्रसंचालन तर हेमलता टोणपे यांनी आभार प्रदर्शन केले.