सोलापूर ब्रेकिंग! 'नामांकित' रुग्णालयातील वॉर्डबॉय निघाला कोरोना पॉझिटिव्ह

Ward Boy Corona Positive at Solapur Hospital
Ward Boy Corona Positive at Solapur Hospital

सोलापूर : शहरातील एका नामांकित रुग्णालयात काम करणारी नर्स पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारा चतुर्थश्रेणी कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. तो तरुण देगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील संत रोहिदास नगरातील असल्याने तो परिसर पोलिसांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्याच्या कुटुंबातील सात जणांना तर त्या परिसरातील 60 ते 70 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले आहे. नई जिंदगीसह शहरातील जुन्याच ठिकाणी आणखी काही ठिकाणी रुग्ण आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडू लागली आहे. सोलापुरात सर्वप्रथम पाच्छा पेठेत कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यानंतर शास्त्रीनगरमध्येही अधिक रुग्ण आढळले. सोलापूर शहरातील सुमारे 26 हून अधिक ठिकाणे प्रतिबंधितक्षेत्र म्हणून पोलिसांनी जाहीर केली आहेत. एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सच्या माध्यमातून सोलापूर शहरातील कोरोना विषाणूने बाळे येथे पाय ठेवला. त्यानंतर आता देगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या परिसरातील नागरिकांना पोलिसांनी घरातच राहण्याचे आवाहन केले असून विनाकारण घराबाहेर दिसल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, सोलापूर शहरात महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी सर्वे होत असतानाही सापडत असल्याने या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

'त्याच्या' कुटुंबातील सदस्य उन्हाळ्यामुळे गल्लीत बसायचे...
सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे उन्हाचा पाराही चढू लागला आहे. शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये काम‌ करणाऱ्या त्या तरुणाचे घर पत्र्याचे असल्याने घरात उकडते म्हणून त्याच्या कुटुंबातील सदस्य परिसरातील काही लोकांशी घरासमोर बसून गप्पा मारत होते. त्यामुळे त्याच्या घराच्या आजूबाजूचे 60 ते 70 लोकांना वैद्यकीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेल्याची माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी दिली. यावेळी नागरिकांनी सुरक्षितता म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन तेथील नगरसेवक गणेश वानकर यांनी केले आहे.

देगागाव परिसर केला सील
देगाव जिल्हा परिषद शाळेसमोरील संत रोहिदास नगर येथे राहणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो तरुण शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. त्याला कोरोना झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होताच तो परिसर प्रतिबंधित म्हणून जाहीर केला असून त्याच्या कुटुंबातील व परिसरातील लोकांना तपासण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले आहे.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com