हे काय चालंय..! महाराष्ट्रातील पाणी कर्नाटकात पळविले

हे काय चालंय..! महाराष्ट्रातील पाणी कर्नाटकात पळविले

तडवळ (सोलापूर ) : खानापूर येथे 30 एप्रिलला रात्री साडेबारा वाजता कर्नाटकातील नागरिकांनी भीमा नदीपात्रावरील बंधाऱ्याची दारे काढून पाणी पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, खानापूरच्या ग्रामस्थांनी बंधाऱ्याची दारे पुन्हा टाकून पाणी अडविले. 
खानापूर बंधाऱ्यातून गुड्डेवाडी, अंकलगी, खानापूर गावांकरिता पिण्यास, जनावरांना व शेतीस पाणीपुरवठा होतो. 

हेही वाचा- रणजितसिंह मोहिते-पाटील यांची विधानपरिषदेवर निवड होणार का? 
उजनी धरणातून सोडलेले पाणी 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उजनी धरणातून सोडलेले पाणी भीमा नदीत आले. सध्या कोरोना महामारीने भयावह संकट ओढवले आहे. कर्नाटकातील 30 ते 35 नागरिकांनी रात्री पिकअप टेम्पो व दुचाकीवर येऊन लाकडाउनचा फायदा उठवत बंधाऱ्याची दारे उचलली. रात्रभर मोठ्या प्रवाहाने पाणी कर्नाटकात वाहून गेले. सदरची माहिती तेथील नागरिकांनी रात्री फोनद्वारे खानापूर व अंकलगीतील ग्रामस्थांना कळविली. त्यानंतर 100 ते 125 ग्रामस्थांनी उपलब्ध दारे, पाते, खडक टाकून पहाटेपासून दुपारपर्यंत पाणी अडवण्याचा प्रयत्न केल्याने पाणी अडविण्यात यश आले. 

ग्रामस्थांनी कारवाईची मागणी 
कर्नाटकातील नागरिकांनी नेलेली दारे व अन्य मुद्देमाल जप्त करून करावा, सदर टेम्पोचा नंबर ग्रामस्थांकडे असून खानापूर, अंकलगी व गुड्डेवाडीतील ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. अशी माहिती अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड, आमदार सचिन कल्याणशेट्टी, पाटबंधारे विभागाला दिली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com