बियाणे न उगवल्याच्या प्रकरणी बियाणे विक्रेता संघटनेने काय भूमिका मांडली ? ते वाचा

seeds.jpg
seeds.jpg

करमाळा(सोलापूर): कांदा, सुर्यफुल, बाजरीचे बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारीमध्ये तथ्य निघाल्यास बियाणे उत्पादक कंपन्यांना दोषी धरावे. या प्रकरणामध्ये बियाणे विक्रेत्यांना केवळ साक्षीदार ठरवावे, अशी मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर असोसिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

बियाणे विक्रेता कंपनीकडून सील बंद बियाणे खरेदी करतो. बियाणे खरेदी करताना संबंधित कंपनीकडून जीएसटीचे ओरिजनल बिल घेतो. या बिलाची रक्कम अधिकृतपणे बॅंकेतून संबंधित बियाणे उत्पादक कंपनीच्या खात्यात भरतो. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता असून बियाण्याच्या उगवणक्षमता संदर्भात बियाणे विक्रेत्याचा कोणताही संबंध येत नाही.  बियाणे विक्रेता शेतकऱ्यांना संबंधित बियाणाचे खरेदी बिल देतो. यामुळे बियाणे उगवण क्षमता संदर्भात तसेच बियाण्यांच्या कोणताही तक्रारीसंदर्भात बियाणे विक्रेत्याला दोषी न धरता संपूर्ण जबाबदारी बियाणे उत्पादक कंपन्यांवर निश्‍चित करावी. 

यासंदर्भात कृषी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र फर्टीलायझर सीड्‌स डीलर्स असोसिएशनने केली आहे. या आशयाची पत्रे माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांना देण्यात आली आहेत. 

नव्या आदेश रद्द करावेत 
यापुर्वी बियाणे उगवण तक्रारीबाबत कंपनीला दोषी धरून विक्रेत्याला साक्षीदार केले जायचे. मात्र कंपनीसोबत विक्रेत्याला दोषी ठरवण्याचे आदेश नव्याने काढले आहेत. हे आदेश रद्द करावेत. कृषी खात्याने बियाणांचे सॅम्पल घेऊन उगवणीबाबत तपासणी करायला हवी. 
- महेश चिवटे, संचालक, महाराष्ट्र सीडस फर्टीलायझर असोसिएशन 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com