व्हॅाटसअप, सिग्नल ते टेलिग्राम ; सोशल मिडियाचा बदलतोय चेहरा

अनुराग सुतकर
Sunday, 17 January 2021

सध्या टेलिग्राम या ॲपचे जगभरात 500 मिल्लियन ऍक्टिव्ह युजर्स आहेत आणि गेल्या काही तासात 25 मिलियन युजर्सची त्यात भर पडली आहे त्यापैकी 38% युजर्स हे एकट्या आशियातील आहेत. 27% युजर्स हे युरोपमधील आहेत. तर 21 टक्के युजर्स हे अमेरिकेतील आहेत. मुळात विषय हा आहे की तरुणांमध्ये विकसित होणारे तंत्रज्ञान आहे हे त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात उपयोगी पडले पाहिजे हा एकमेव हेतू ॲप्स निर्माण करणाऱ्या कंपनीचा असतो. परंतु वैयक्तिक आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी जर या ॲप्स च्या निमित्ताने शेअर होत असतील तर त्यावर फक्त यूजर्सचाच अधिकार असला पाहिजे , या तत्वाला जवळपास जगभरातील सर्व तरूण वळताना दिसत आहेत. त्यामुळेच टेलिग्राम असो की सिग्नल ॲप असो , तरुणांमध्ये वैयक्तिक आयुष्य हे अबाधित असावे ही मानसिकता रूजत जात आहे.

सोलापूर : सध्याला व्हाट्सअप चे बदललेले धोरण हा तरुणांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे . संदेश ग्रहण करण्यासाठी व्हाट्सअप सारखे अनेक ॲप्स बाजारात उपलब्ध आहेत. परंतु व्यक्तीची वैयक्तिक माहिती अबाधित ठेवण्यासाठी काही मोजकेच ॲप्स काम करतात. या आठवड्यामध्ये तर फारशा युजर्सनी व्हाट्सअप च्या बदललेल्या धोरणाला नाकारले आहे. त्याला पर्याय म्हणून सिग्नल या ॲप बद्दल लोकांचे कुतूहल वाढले आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात टेलिग्राम या ॲप्स चे युजर्स वाढल्याने तरुणांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

सध्या टेलिग्राम या ॲपचे जगभरात 500 मिल्लियन ऍक्टिव्ह युजर्स आहेत आणि गेल्या काही तासात 25 मिलियन युजर्सची त्यात भर पडली आहे त्यापैकी 38% युजर्स हे एकट्या आशियातील आहेत. 27% युजर्स हे युरोपमधील आहेत. तर 21 टक्के युजर्स हे अमेरिकेतील आहेत. मुळात विषय हा आहे की तरुणांमध्ये विकसित होणारे तंत्रज्ञान आहे हे त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात उपयोगी पडले पाहिजे हा एकमेव हेतू ॲप्स निर्माण करणाऱ्या कंपनीचा असतो. परंतु वैयक्तिक आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी जर या ॲप्स च्या निमित्ताने शेअर होत असतील तर त्यावर फक्त यूजर्सचाच अधिकार असला पाहिजे , या तत्वाला जवळपास जगभरातील सर्व तरूण वळताना दिसत आहेत. त्यामुळेच टेलिग्राम असो की सिग्नल ॲप असो , तरुणांमध्ये वैयक्तिक आयुष्य हे अबाधित असावे ही मानसिकता रूजत जात आहे.

टेलिग्राम का वापरतात ?
- टेलिग्राम हे ॲप फक्त मेसेज देवानघेवान च ॲप नाही तर ते एक सर्च इंजिन म्हणून काम करते.
-व्हाट्सअप वर तुम्ही एका ग्रुपमध्ये साधारणतः 256 जणांना ऍड करू शकता परंतु टेलिग्राम मध्ये तुम्ही 200000 मेंबर ऍड करू शकता.
-यूट्यूब सारखे तुम्ही टेलिग्राम वर चायनल ही बनवू शकता त्याच्यामध्ये अनलिमिटेड मेंबर्सना ऍड करू शकता कंटेंट अपलोड करू शकता , व त्याची पब्लिक लिंक बनवू शकता.
- टेलिग्राम वर तुम्ही 2जीबी लिमिट असणारी कोणतीही फाईल पाठवू शकता.

फायदा  काय आहे ? 

- जर तुम्हाला मोठ्या साईज मधील इमेजेस फाइल्स पाठवायच्या असतील तर तुम्ही टेलिग्राम वरून बिनधास्त पाठवू शकता.
- जर तुम्हाला वाटत असेल की स्वतःचे चैनल ओपन करून आर्थिक फायदा होत असेल तर तुम्ही टेलिग्राम वर सुधा स्वतःचं चॅनल ओपन करू शकता.
- सोशल माध्यमांच्या मार्फत होणारे वैयक्तिक आयुष्यातील संभाषण तुम्ही सिक्युअर करण्यासाठी हे ॲप वापरू शकता.
- व्हाट्सअप चे बदललेली धोरण जर तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही टेलिग्राम सारख्या ॲप कडे वळु शकता.

वैयक्तीक माहिती अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचा अधिकार

व्हॅाटसअपने आपले धोरण जरी बदलले तरी पुर्वीसारखा विश्वास ते संपादन करणे अशक्य आहे. त्यामुळे टेलीग्राम सारखे मेसेंजर अॅप वापरणे आणि आपली वैयक्तीक माहिती अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचा अधिकार देखील आहे. 
- अनिकेत जाधव, सोशल मिडिया अभ्यासक, सोलापूर  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp, Signal to Telegram; The changing face of social media