चाके थांबली अन्‌ ट्रॅव्हल्स व्यवसायही थांबला 

चाके थांबली अन्‌ ट्रॅव्हल्स व्यवसायही थांबला 
Updated on

सोलापूर : सोलापूर परिसरात लॉकडाउनच्या काळात ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान या व्यावसायिकांचे झाले आहे. सोलापूर परिसरामध्ये ट्रॅव्हल्स बस मालकांची संख्या पाच एवढी आहे. यासोबतच शहरामध्ये चालकांसाठी वाहने उपलब्ध करून देणाऱ्या एजंटांची संख्या 200 एवढी आहे. 

दरवर्षी पर्यटन सहली 
बस मालक वगळता खासगी कार आणि इतर वाहनांद्वारे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या खूप मोठी आहे. दरवर्षी विविध प्रकारच्या पर्यटन सहली आयोजिल्या जातात. सोलापूरचा पर्यटन व्यवसाय प्रामुख्याने पुणे, मुंबईशी जोडलेला आहे. अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या राज्य आणि राज्याबाहेरील पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे. या पर्यटकांना तीर्थक्षेत्रावर पोचवणे आणि परत घेऊन जाण्यासाठी खासगी वाहने बुक केली जातात. लग्न सराईत या व्यावसायिकांना मोठा व्यवसाय मिळतो. पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित केल्या जातात. त्यात प्रामुख्याने कपिलधार, रामलिंग ही प्रमुख ठिकाणे आहेत. 

सुट्यांमध्ये मोठी चालना 
पर्यटन व्यवसायाला दिवाळीच्या सुट्यांमध्ये मोठी चालना मिळते. केवळ बसचालकाने पुढचा विचार केला तर या व्यवसायात 25 ते 30 लाख रुपयांची उलाढाल होते. या वर्षी लॉकडाउनमुळे या व्यावसायिकांचा लग्नसराईचा हंगाम गेला. अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिरे बंद असल्याने भक्तांची ये-जा थांबली. याही व्यवसायात मोठा फटका बसला. त्यामुळे या व्यावसायिकांना चालकांचे पगार देणे कठीण झाले आहे. तसेच, सहलीचे आयोजन करून देणारे 150 ते 200 जणांवर बेरोजगारीची वेळ आली. त्यामुळे या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा, असा प्रश्‍न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. 

खासगी प्रवासी वाहतूक सुरू नाही 
बाजारपेठ सुरू झाली तरी अद्याप खासगी प्रवासी वाहतूक सुरू झालेली नाही. ही वाहतूक सुरू झाली तरी पर्यटक आणि प्रवासी त्याला किती प्रतिसाद देतील, याबाबत देखील शंका निर्माण झाली आहे. यामुळे सध्यातरी सोलापूर परिसरात तब्बल एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक चालकांना काही मालकांनी महिन्याचा पगार दिला; मात्र पुढे त्यांना काम मिळाले नाही, हे चालक आता बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा चालकांची संख्या 500 ते एक हजार इतकी आहे. यामध्ये खासगी कारचालकांचाही समावेश आहे. 


हा व्यवसाय कधी सुरू होईल? 
सोलापूर परिसरामध्ये खासगी प्रवासी वाहतूक आणि पर्यटन व्यवसायाला एक कोटी रुपयांवर फटका बसला. अजूनही हा व्यवसाय कधी सुरू होणार, हा प्रश्‍न आहे. 
- नागेश बेनूरकर, 
यमाई ट्रॅव्हल्स, सोलापूर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com