मंगळवेढा तालुक्‍यात नऊ उपकेंद्रांच्या उभारणीला कधी लागणार मुहूर्त ? 

हुकूम मुलानी
Thursday, 6 August 2020

तालुक्‍यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने तत्कालीन आरोग्य सभापती शिवानंद पाटील यांनी पाठपुरावा करून कात्राळ, सोड्डी, येड्राव, खोमनाळ, ढवळस, अकोला, लेंडवे चिंचाळे, सलगर खु, कचरेवाडी अशा नऊ गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास व हुलजंती आरोग्य केंद्रास मंजूरी मिळाली होती. त्यानंतर जागा उपलब्ध करून निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा कमी पडल्याने या उपकेंद्रांचे काम रखडले. जिल्ह्यातील इतर तालुक्‍यात मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास त्या लोकप्रतिनिधींनी निधी नेऊन ती कामे मार्गी लावली. मंगळवेढ्यातील कामास मात्र अद्याप मुहूर्त मिळाला नाही. 

मंगळवेढा(सोलापूर) : कोरोनाचा प्रभाव तालुक्‍यातील ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा परिषद आरोग्य विभाग याबाबत उदासिन आहे. तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता काही वर्षांपूर्वी नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व एका आरोग्य केंद्राला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, अद्याप हे आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्यास मुहूर्त सापडला नाही.  

हेही वाचाः या तालुक्‍यात कोरोनाबाधितांच्या तपासणीसाठी मोबाईल क्‍लिनिकला मिळतोय प्रतिसाद 

तालुक्‍यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने तत्कालीन आरोग्य सभापती शिवानंद पाटील यांनी पाठपुरावा करून कात्राळ, सोड्डी, येड्राव, खोमनाळ, ढवळस, अकोला, लेंडवे चिंचाळे, सलगर खु, कचरेवाडी अशा नऊ गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास व हुलजंती आरोग्य केंद्रास मंजूरी मिळाली होती. त्यानंतर जागा उपलब्ध करून निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा कमी पडल्याने या उपकेंद्रांचे काम रखडले. जिल्ह्यातील इतर तालुक्‍यात मंजूर असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास त्या लोकप्रतिनिधींनी निधी नेऊन ती कामे मार्गी लावली. मंगळवेढ्यातील कामास मात्र अद्याप मुहूर्त मिळाला नाही. 

हेही वाचाः बार्शी येथे काळ्याबाजारात जाणारा लाखो रुपयांचा रेशनचा माल जप्त 

मंजुरीनंतर गेल्या तीन वर्षातील कामगिरी संथगतीने सुरू असल्यामुळे या उपकेंद्राच्या भूमिपूजनाचा नारळ फुटला नाही. त्यासंदर्भात जागेचा उपलब्धता व निधी उपलब्ध न झाल्यामुळे तालुक्‍यातील जनतेमधून कोरोना संकटात संताप व्यक्त केला जात आहे. तामदर्डी येथील जागेअभावी कामकाज इतरत्र केले जात आहे. जागतिक संकट असलेल्या कोरोनाच्या तीन महिन्यात तालुक्‍यातील आरोग्य सेवेवरील ताण विचारात घेता तालुक्‍याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने मंजूर असलेल्या नऊ उपकेंद्र व प्रास्ताविक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्‍यकता आहे. तर याशिवाय प्रस्तावित असलेल्या उपकेंद्रात नंदुर, तळसंगी, पडोळकरवाडी, गुंजेगाव याबरोबर कारखाना साईट, हुलजंती व निंबोणी येथील आरोग्य केंद्राचा प्रस्ताव शासन दरबारी पडला आहे. 

आरोग्य यंत्रणेचा ताण कमी होईल 
पाठपुरावा करून तालुक्‍यातील 9 गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे मंजूर केली व तीन ठिकाणी आरोग्य केंद्रासाठी प्रस्ताव दिला. लोकसंख्या व आरोग्य यंत्रणेचा ताण लक्षात घेता हा प्रश्न मार्गी लागणे आवश्‍यक आहे. 
- शिवानंद पाटील, माजी आरोग्य सभापती, जिल्हा परिषद 

ग्रामपंचायतीनी जागेचा प्रश्‍न सोडवावा 
मंजूर उपकेंद्रासाठी काही गावात जागा उपलब्ध झाली तर काही गावात नाही. ग्रामपंचायतीने यात पुढाकार घेवून जागा उपलब्ध करून दिली तर यंत्रणेवरील ताण कमी होईल. 
- डॉ. नंदकुमार शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी 

निधीसाठी पाठपुरावा करणार 
मंगळवेढा तालुक्‍यात मंजूर उपकेंद्र व प्रस्तावित उपकेंद्राला जागा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्यास निधीसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करणार आहे. 
- प्रेरणा मासाळ, सभापती, पंचायत समिती, मंगळवेढा 

आरोग्य सेवा सक्षम करावी 
तालुक्‍याच्या वाढती लोकसंख्या व कारखानदारीचा विचार करून प्रलंबित ग्रामीण रूग्णालयास मंजूरी देण्याची गरज आहे. तालुक्‍यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी शासनाचे डोळे कधी उघडणार. 
- बिरू घोगरे, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना समिती 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the construction of nine substations in Mangalvedha taluka take place?