krushi kendra.jpg
krushi kendra.jpg

शासनाचे आदेश डावलून एैन शेती हंगामात कृषी केंद्रे बंद ठेवण्याचे प्रकार कुठे? ते वाचा 

Published on

माळीनगर(सोलापूर): लॉकडाउन करताना शेतीच्या कामात अडथळा येणार नाही. याची दक्षता घेण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तरीदेखील कोरोना संसर्गामुळे ठिकठिकाणी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये कृषीविषयक दुकाने बंद ठेवली जात आहेत. यामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा होऊ लागला आहे. 

सध्या ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असल्याने अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यात येत आहे. त्याचा शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या दवाखाने, मेडिकल, दूध यांनाच परवानगी देण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने शेतकऱ्यांना शेतात कामे करता येत नाहीत. आता तीन-चार दिवस पाऊस नसल्याने जमिनीला वाफसा आला आहे. त्यामुळे ऊस लागवड, पेरणी व मशागतीची कामे शेतकरी करीत आहेत. 

लॉकडाउनमध्ये कृषीविषयक दुकाने बंद ठेवली जात असल्याने बी-बियाणे, औषधे, खते, अवजारे, स्प्रेपंप आदी शेतकऱ्यांना खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे शेतीला 'ब्रेक'लागत आहे. अगोदरच शेतीवर अनेक संकटे आल्याने शेती धंदा तोट्यात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या स्थितीत लॉकडाउन करताना शेती व शेतकऱ्यांना अडचणीत आणू नयेत.शेती धंदा निसर्गावर अवलंबून आहे. त्यासाठी दोन-चार दिवस थांबून चालत नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे पेरण्या, ऊस लागवड पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लॉकडाऊन करताना संबंधित अधिकाऱ्यांनी कृषीविषयक दुकाने चालू ठेवण्याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. 

शेतीच्या कामाचा खोळंबा 
यामुळे शेतीच्या कामांचा खोळंबा होत असल्याने कृषीविषयक दुकाने चालू ठेवण्याची गरज आहे. 
- विजयकांत कुदळे, संस्थापक शेतकरी जागरण मंच 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com