आदिनाथ साखर कारखाना सहकारी तत्वावरच चालवण्याचा विचार महत्वाचा, असे कोण म्हणाले? ते वाचा 

अण्णा काळे
रविवार, 12 जुलै 2020

विद्यामान संचालक मंडळाने आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. या विषयी जेऊर (ता. करमाळा) येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, बिबिषण आवटे, धुळाभाऊ कोकरे, उदयसिंह मोरे-पाटील, संतोष पाटील, अजित तळेकर, अतुल पाटील, महेश चिवटे, देवानंद बागल, गहिनीनाथ ननावरे, दत्तात्रय सरडे, गोपाळ मंगवडे, धनंजय गोडसे, आदिनाथ लाळगे, ऍड. अजित विघ्ने उपस्थित होते. 

करमाळा(सोलापूर): करमाळा तालुक्‍यात सहकारी साखर कारखाना व्हावा, यासाठी तालुक्‍यातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आदिनाथ कारखाना हा सहकारी तत्वावरच चालला पाहिजे. यासाठी आपण आग्रही आहोत. कारखाना विद्यमान संचालक मंडळानी चांगला चालवावा. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भुमिका आहे. त्यातुनही सत्ताधाऱ्यांनी आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर चालवायलाच देण्याचे ठरवलेच असेल तर माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन कारखाना आपण चालवून दाखवू, अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. 

हेही वाचाः या तालुक्‍यात सापडले नव्याने तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण रुग्णसंख्या झाली सहा 

विद्यामान संचालक मंडळाने आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. या विषयी जेऊर (ता. करमाळा) येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, बिबिषण आवटे, धुळाभाऊ कोकरे, उदयसिंह मोरे-पाटील, संतोष पाटील, अजित तळेकर, अतुल पाटील, महेश चिवटे, देवानंद बागल, गहिनीनाथ ननावरे, दत्तात्रय सरडे, गोपाळ मंगवडे, धनंजय गोडसे, आदिनाथ लाळगे, ऍड. अजित विघ्ने उपस्थित होते. 

हेही वाचाः राज्यस्तरीय त्रिसदस्यीय समितीची बार्शीला भेट 

श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारखान्यातील कामगार बंधूनाही विश्‍वासात घेऊन काम करण्याची आपली तयारी आहे. कारखाना होण्यासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. कारखान्याच्या मालकीची 200 एकर जमीन व कारखान्याच्या परिसरात लाखो मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. कारखाना हा करमाळा तालुक्‍यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सभासद नसलेल्या लोकांनाही या कारखान्यविषयी आपुलकी वाटते. कारखाना सुरू होण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे हा कारखाना सहकारी तत्वावरच चालण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. तालुक्‍यात दरवर्षी 40 ते 45 लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होते. तरीही गेल्यावर्षी कारखान्याचे गाळप बंद ठेवले असेही त्यांनी सांगितले. 

कारखाना सभासदांचा असावा 
माझे वडीलांनी हा कारखाना उभा रहावा म्हणुन 23 वर्ष पायात चप्पल घातली नाही. जेव्हा कारखाना सुरू झाला तेव्हाच त्यांनी पायात चप्पल घातली. एवढ्या त्यागातून उभा राहिलेला कारखाना जर भाडेतत्त्वावर देण्याची भाषा वापरली जात असेल तर याचा कुठे तरी विचार झाला पाहीजे. हा कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे ही सभासदांची भावना आहे. बाहेरच्या लोकांना कारखाना देण्यास आमचा स्पष्ट विरोध आहे. आदिनाथ विषयी लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहे. 
- नारायण पाटील, माजी आमदार 
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who says that aadinath suger industry should run on co-operative base