ओबीसी प्रवर्गाच्या कल्याणासाठी सरकारने स्थापन केलेली महाज्योती संस्था कार्यान्वित का झाली नाही? कोणी मांडला प्रश्‍न ते वाचा 

ओबीसी प्रवर्गाच्या कल्याणासाठी सरकारने स्थापन केलेली महाज्योती संस्था कार्यान्वित का झाली नाही? कोणी मांडला प्रश्‍न ते वाचा 
Updated on

माळीनगर(सोलापूर): इतर मागासवर्ग,भटक्‍या-विमुक्त जाती,जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी राज्य सरकारने वर्षभरापूर्वी स्थापन केलेली 'महाज्योती' ही संस्था अद्याप कार्यन्वित झालेली नाही. यासोबत ओबीसी व इतर प्रवर्गातील सामाजीक व शैक्षणीक विकासाचे प्रश्‍नाची सोडवणूक करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. महाज्योती संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 रोजी झाली होती. इतर मागासवर्ग,भटक्‍या विमुक्त जाती जमाती,विशेष मागास प्रवर्गातील समाज वर्षानुवर्षे विकासापासून वंचित आहे. 

अनेक वर्षांपासून ओबीसींच्या प्रश्नांची नीटपणे सोडवणूक झाली नाही. हा सर्व समाज आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. कारण या समुदायातील लोकांची उपजीविका अल्पभूधारक शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर, बांधकाम मजूर, खाण कामगार यासारख्या क्षेत्रात अवलंबून राहिली आहे. त्यामुळे यातील अनेकांच्या दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. 
या प्रवर्गाच्या शैक्षणिक व सामाजीक विकासासाठी अनेक मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे. 'महाज्योती'ला तत्काळ एक हजार कोटी रुपये निधी द्यावा. ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील मुला-मुलींना देखील एमपीएससी,यूपीएससीसाठी मोफत प्रशिक्षण द्यावे. 93 व्या घटना दुरुस्तीप्रमाणे ओबीसींसाठी एमबीबीएस, एमडीसाठी 27 टक्के आरक्षण ठेवावे. अकृषिक विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीमध्ये केंद्र सरकारने लागू केलेला रिझर्वेशन इन टीचर्स कॅडर ऍक्‍ट 2019 राज्यात लागू करावा. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. व्यावसायिक अभ्यासक्रमांची बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी. इबीसी व इएसबीसी प्रमाणे ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसींना डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता मिळावा. ओबीसींची नॉनक्रिमिलिअर उत्पन्न मर्यादा 15 लाख रुपये करावी. ओबीसींचा शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील नोकऱ्यांचा अनुशेष तत्काळ भरावा 
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृह असावेत. 

आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही 
सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी महाज्योती संस्थेकडून अधिक न्याय अपेक्षित आहे. या संस्थेची कार्यवाही त्वरित न झाल्यास इतर मागासवर्ग,भटके-विमुक्त व विशेष मागास प्रवर्गाच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी ओबीसी समाजास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. 
- रघुनाथ ढोक, सरचिटणीस, राष्ट्रीय ओबीसी महासंघ 
 

संपादनः  प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com