"एनआरसी'पेक्षा "एमआयएम'ला सोलापूरची निवड महत्त्वाची ? 

प्रमोद बोडके
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

दोन दिवसात ओवेसींना भेटणार 
एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्षपद व सोलापूर जिल्ह्याचे प्रभारीपद तौफिक शेख यांच्याकडे होते. फारुख शाब्दी ग्रामीण भागातील असल्याने त्यांची नियुक्ती सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करावी, शहराध्यक्षपदी तौफिक शेख यांनाच कायम ठेवावे अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. तौफिक शेख यांना पदावरून हटवू नये या मागणीसाठी आम्ही येत्या दोन दिवसात पक्षाध्यक्ष व खासदार असदोद्दिन ओवेसी यांची भेट घेणार आहोत. त्यानंतर आम्ही आमची पुढची भूमिका ठरवू अशी माहितीही यावेळी नगरसेवकांनी दिली. 

सोलापूर : ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहदुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमच्या सोलापुरातील नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. पक्षाची राज्याची कार्यकारिणी बरखास्त झालेली असताना फक्त सोलापूर शहराध्यक्षाचीच निवड का करता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणलेल्या एनआरसी, सीएए या कायद्यांना देशभर विरोध होत असताना तुम्हाला सोलापूरच्या शहराध्यक्षाचीच निवड महत्त्वाची वाटते का? असा सवाल सोलापुरातील नगरसेवकांनी एमआयएमच्या प्रदेश कार्याध्यक्षांना व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारला आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/lokmangal-draws-mutual-loan-name-farmer-260030">हेही वाचा - लोकमंगलने काढले शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज 
सोलापूरचे शहराध्यक्ष व जिल्हा प्रभारी तौफिक शेख सध्या कर्नाटकात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जागेवर अन्य पदाधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी व निवडणूक निरीक्षक तेलंगणातील एमआयएमचे नेते अन्वर सादार सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांनी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहराध्यक्षपदी फारुख शाब्दी यांची निवड जाहीर केली आहे. या निवडीला एमआयएमच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी नगरसेवकांनी आज पत्रकार परिषद घेतली. 
हेही वाचा - सोलापूरच्या एमआयएममध्ये फूट; नगरसेवकांनी दिला राजीनाम्याचा इशारा 
या निवडीबद्दल आम्हाला पक्षातील वरिष्ठांनी विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला आहे. एमआयएममध्ये हुकूमशाही आहे का? या प्रश्‍नावर मात्र थेट भाष्य करण्याचे नगरसेवकांनी टाळले. शहराध्यक्षपदी तौफिक शेख यांनाच कायम ठेवावे अन्यथा आम्ही नगरसेवक पदाचे राजीनामे देऊ असा इशाराच नगरसेवकांनी आज दिला आहे. या पत्रकार परिषदेला नगरसेविका शाजिया शेख, तस्निम शेख, पूनम बनसोडे, वहिदा शेख, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, अमित अजनाळकर, अल्ताफ बेलिफ, इक्‍बाल शेख आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is MIM Solapur's choice more than "NRC"?