सोलापूरमधील आसरा रेल्वे पुलाचे रुंदीकरण करा : संभाजी ब्रिगेड 

Asra pul online.jpeg
Asra pul online.jpeg

सोलापूर : विजापूर रोड वरील रेल्वे पूल बंद झाल्यामुळे या मार्गावरून होणारी जड वाहतूक डी-मार्ट, आसरा चौक होटगी रोड या मार्गावर वळविण्यात आल्यामुळे तसेच डी मार्ट, आसरा चौक होटगी रोड वरील वाहतूक जाम होत असून दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आधीच अरुंद असलेल्या आसरा रेल्वे ब्रिज पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे खड्डे चुकवताना जीव जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आसरा पुलावरील खड्डे त्वरित बुजविण्याऐवजी संपूर्ण रस्ता साईड पट्टीसह दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष श्‍याम कदम यांनी दिला आहे. 

या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे असल्यामुळे पूर्वी अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. खड्डा चुकविताना एसआरपी जवानासह दोन तीन नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या विजापूर रोड बंद केल्याने जड वाहतूक होटगी रोडने वळवली पण मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरीक व इतर वाहनचालक जीव मुठीत धरून जात आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. 

बंदी काळात जड वाहतूक बंदीची कडक अंमलबजावणी करावी. महावीर चौक आसरा चौक, डी मार्ट, आयटीआय चौक टाकळीकर मंगल कार्यालय रोडवर तास वाहतुक कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. आठ दिवसांपूर्वी सोलापूर महापालिका आयुक्त यांना मार्गावरील खड्डे बुजवण्याचे निवेदन दिले होते. प्रशासनाने फक्त रस्त्यात प्रीमिक्‍स टाकून ठिगळ लावण्याचे काम केले आहे. ड्रिनेजच्या कामासाठी विजापूर रोडवरील चार चाकी आणि जड वाहतूक, सैफुल, मार्गे डी-मार्ट मार्गे आसरा चौक व पुढे अशी वळवली आहे, पण तो बदल करण्याच्या आधी प्रशासनाने आसरा पूल सुस्थितीत आहे का ? ते तपासलं आहे का? नाहीतर विजापूर रस्त्यावरील दुरुस्तीसाठी आसरा पूल ढासळण्याची दाट शक्‍यता निर्माण होईल. कारण तो ब्रीज इतक्‍या प्रमाणात होणाऱ्या जड वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? हे बांधकाम विभागाकडून अगर रेल्वे विभागाकडून प्रमाणित करण्यात यावे, आणि मगच जड वाहतुकीला परवानगी द्यावी. 

यापूर्वी संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने हद्दवाढ भागात अनेक नवीन वसाहती निर्माण झाले आहे त्यामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आसरा रेल्वे पूल खूप अरुंद असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत असते. सुमारे वीस वर्षांपूर्वी बांधलेला जुळे सोलापूर भागाला जोडणारा आसरा रेल्वे पूल अत्यंत अरुंद असल्याने या मार्गाची रुंदीकरण करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता पण अकार्यक्षम महानगर पालिका प्रशासनाने त्याकडे ही दुर्लक्ष केले होते त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी भारतीय जैन संघटनेचे श्‍याम पाटील, संभाजी ब्रिगेड उपशहर प्रमुख सिताराम बाबर, कृष्णा झिपरे, हर्षवर्धन शेषेराव, बसवराज आळगे उपस्थित होते. 

आसरा पूल सक्षम आहे का ? 

ड्रिनेजच्या कामासाठी विजापूर रोड वरील चार चाकी आणि जड वाहतूक, सैफुल, मार्गे डी-मार्ट मार्गे आसरा चौक व पुढे अशी वळवली आहे. पण तो बदल करण्याच्या आधी प्रशासनाने आसरा पूल सुस्थितीत आहे का ? ते तपासलं आहे का? तो पूल अती जडवाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? हे बांधकाम विभागाकडून अगर रेल्वे विभागाकडून प्रमाणित करण्यात यावे, आणि मगच जड वाहतुकीला परवानगी द्यावी. 

संपादन : अरविंद मोटे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com