बचत करत महिला साकारताहेत स्वप्न 

सुस्मिता वडतीले
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

  • प्रियदर्शिनी महिला बचत गटाची यशोगाथा 
  • गटाची स्थापना 1998ला झाली 
  • गटात 14 महिला सभासदांचा समावेश 
  • पैकी 10 सभासद दारिद्य्ररेषेखालील 

सोलापूर : प्रियदर्शिनी महिला बचत गटाची स्थापना 1998ला झाली. या बचत गटात 14 महिला सभासद आहेत. त्यापैकी 10 सभासद दारिद्य्ररेषेखालील आहेत व चार जनरल आहेत. प्रियदर्शिनी महिला बचत गटातील महिलांनी छोटे-मोठे उद्योग सुरू केले आहेत. तसेच गटाच्या प्रगतीसाठी व छोट्या-छोट्या उद्योगातून महिलांची प्रगती होऊन त्या कमवत्या कशा होतील यावर जास्त भर दिला जात आहे. 

हेही वाचा - चौकशी अहवालात नाव असलेले आमदार सुभाष देशमुख म्हणाले... 

या बचत गटातील महिला किराणा व जनरल स्टोअर्स, दुग्धव्यवसाय, शिलाई उद्योग, स्क्रिन प्रिटिंग, कापड उद्योग असे अनेक व्यवसाय करत आहेत. 
तसेच या बचत गटाला 21 दिवसांचे ताग प्रशिक्षण मिळाले आहे. या प्रशिक्षणाने महिलांना एक चांगला उद्योग मिळाला आहे. महिलांनी तागाच्या चांगल्या वस्तू बनवून सोलापूर जिल्ह्यात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात, संक्रांतीतील गड्डा यात्रेत तसेच सकाळ सुपर शॉपिंगमध्येही भाग घेतला होता. बचत गटातील महिला चकलीचा गृहोद्योग करत आहेत. सध्या गटाच्या माध्यमातून चकलीला व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रोज चार गावांना या चकली पुरवठा केला जातो. तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई ओळखून बचत गटामार्फत दोन हातपंपांची सोय केली आहे, अशी अनेक कामे बचत गटामार्फत केली जातात. 

हेही वाचा - मोहोळमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने बाराचीचा विद्यार्थी ठार 

भांडवलात 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ 
आमच्या गटाने निवडलेला व्यवसाय आजही चालू आहे. याव्यतिरिक्त लसीकरण मोहीम, माता बालसंगोपन, आरोग्यविषयक जनजागृती, हुंडापद्धत, बालविवाहाला विरोध व जनजागृती, दारूबंदी, एड्‌सविषयी जनजागृती, आहार सप्ताह, किशोरी मुलींना प्रशिक्षण अशा विविध समाजोपयोगी कामांत गटातील महिलांचा सक्रिय सहभाग असतो. बचत गटाच्या भांडवलामध्ये 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 
- वनिता तंबाके, अध्यक्ष, प्रियदर्शिनी महिला बचत गट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women are dreaming of saving