"झेडपी'च्या पदवीधर कर्मचारी संघटनेचे काळ्या फिती लावून कामकाज 

संतोष सिरसट 
Tuesday, 8 September 2020

सोलापूर ः महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आज काळ्या फिती लावून कामकाज केले. संघटनेच्या मागण्या त्वरित सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

सोलापूर ः महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आज काळ्या फिती लावून कामकाज केले. संघटनेच्या मागण्या त्वरित सोडविण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

संघटनेच्यावतीने आमदार, खासदार, मंत्री यांना वारंवार निवेदने देऊनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संघटनेला नाविलाजाने काळ्या फिती लावून कामकाज करावे लागले. कनिष्ठ सहाय्यक या पदाची सेवाप्रवेश नियम 40-50-10 याप्रमाणे तत्काळ प्रसिद्ध करावी, जिल्हा परिषदेतील परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे पदोन्नती अथवा समायोजन करणे, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी तत्काळ दूर करणे, ज्या कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ दिल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीची वसुली थांबवणे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लाभ मंजूर करणे, अश्‍वासित प्रगती योजना अंतर्गतेंतर्ग 2016 पूर्वी नियमित 10 वर्ष 12 वर्ष कालावधी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना 20 वर्ष सेवेनंतर दुसरा लाभ मंजूर करणे, कालबद्ध 10, 20 व 30 वर्ष लाभाची थकबाकी तत्काळ देणे या प्रमुख मागम्यांसाठी राज्यभर हे आंदोलन झाले. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. 

आंदोलनाला मागासवर्गीय कर्मचारी संघटना, अभियंता कर्मचारी संघटना, लिपीक लेखा सहा. कर्मचारी संघटना, मराठा सेवा संघ कर्मचारी संघटना यांनी पाठिंबा दिला असून मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गिरीश जाधव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नितीन भालके यांनी नेतृत्व केले. आंदोलन यशस्वी होण्यासाठी चेतन भोसले, महेश मालखरे, सविता मिसाळ, सागर पाटील, कमलेश खाडे, सोमनाथ धारक, अनिल गुंड, नरेंद्र सरोदे, अजय रंगदाळ यांनी परिश्रम घेतले. 
महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Working with black ribbons of "ZP's Graduate Employees Union"