esakal | बेरोजगारी वाढली ! नोकरी लागत नसल्याने तरुणाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

SUICIDE

सोलापुरातील आमराई परिसरातील देशमुख-पाटील वस्ती येथे राहणारा संतोष वामन शिंदे नोकरीच्या शोधात होता. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, आठ महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्याने संतोष कामाच्या शोधात होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत नोकरी मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता, असेही कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले. या नैराश्‍येतून त्याने बुधवारी (ता. 12) सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या लोखंडी हुकास बेडशीट अडकवून गळफास घेतला. 

बेरोजगारी वाढली ! नोकरी लागत नसल्याने तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही, या टेन्शनमध्ये सोलापुरातील एका 32 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्या तरुणाच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. 

हेही वाचा : विधान परिषदेसाठी डॉ. धवलसिंहांचे नाव चर्चेत; एका दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी राष्ट्रवादीकडू प्रयत्न 

सोलापुरातील आमराई परिसरातील देशमुख-पाटील वस्ती येथे राहणारा संतोष वामन शिंदे नोकरीच्या शोधात होता. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, आठ महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्याने संतोष कामाच्या शोधात होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत नोकरी मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता, असेही कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले. या नैराश्‍येतून त्याने बुधवारी (ता. 12) सकाळी नऊच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या लोखंडी हुकास बेडशीट अडकवून गळफास घेतला. त्याचा भाऊ गुरुनाथ शिंदे यांनी त्यास बेशुद्ध अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच संतोष शिंदेचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणाची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे. 

हेही वाचा : धक्कादायक! सोलापुरातील "एवढ्या' भाजी विक्रेत्यांना कोरोना 

ठळक बाबी... 

  • पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करूनही आले होते अपयश 
  • नोकरी मिळत नसल्याने संतोष शिंदे होता मागील काही महिन्यांपासून अस्वस्थ 
  • आठ महिन्यांपूर्वी संतोषच्या वडिलांचा झाला होता मृत्यू; त्याचा संतोषला बसला होता धक्‍का 
  • बुधवारी (ता. 12) सकाळी नऊच्या सुमारास संतोषने राहत्या घरात बेडशीटने घेतला गळफास 

विजेचा खांब पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू 
सोहाळे (ता. मोहोळ) येथील शिवारात खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या हेतूने बुधवारी (ता. 12) सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज वाहिनी जोडणीसाठी खांबावर चढलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. लखन महादेव चंदनशिवे असे त्या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. 
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विद्युत खांबावर चढल्यानंतर वायर जोडताना लखन हा पोलसहित खाली पडला. त्यात त्याच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. त्या वेळी त्याचा सहकारी यशवंत नाईकनवरे यांनी उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, लखन चंदनशिवे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल