क्‍लाऊड किचनद्वारे तरुणाने सुरू केली सोलापुरात इटालियन खाद्यपदार्थ सेवा

mayank agrwal.jpg
mayank agrwal.jpg

सोलापूरः शिक्षण घेतल्यानंतर पुणे व मुंबईसारख्या शहरातील करिअरच्या संधी सोडून येथील तरुण मयंक अग्रवाल यांनी सोलापूर खाद्य संस्कृतीमध्ये इटालियन खाद्यपदार्थाची भर घालत क्‍लाऊड किचनच्या माध्यमातून वेगळी कामगिरी केली आहे. पुढील काळातदेखील जे काही करायचे ते सोलापूरमध्येच हा निर्धार त्याने केला आहे. 
मुंबईत हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतल्यानंतर मयंक कोरोना काळात सोलापूरला त्याच्या राहत्या घरी परतला. लॉकडाउनमध्येदेखील आपले करिअर होऊ शकते, हे त्याला क्‍लिक झाले. पदवी शिक्षणातून त्याने सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थाचा अभ्यास केला. सोलापुरात इटालियन फुडचे प्रकार तयार करण्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला. सध्या पिझ्झासारखे पदार्थ इटालियन असले तरी त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. काही डिशेस आठ प्रकारच्या आहेत. गार्लिक ब्रेड, लाझानियासारखे अनेक प्रकार खवैय्यांना मूळ चवीच्या रुपात मिळत नाहीत. हे पदार्थ मूळ पध्दतीने तयार करून त्याचा स्वाद इतर कोणत्याही तयार फूडपेक्षा अधिक ताजेपणाचा अनुभव देणारा असतो, हे लक्षात घेऊन त्याने क्‍लाऊड किचन सुरु केले. क्‍लाऊड किचनमुळे ग्राहकांना लॉकडाऊनमध्येदेखील इटालियन फूड उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे मयंकने कोरोनाने काही दिवस क्वारंटाईन झाल्यानंतर पूर्णपणे बरे होऊन मोठ्या जिद्दीने या व्यवसायाची उभारणी केली. या क्‍लाऊड किचनमध्ये केवळ इटालियन फूड एवढेच प्रकार त्याने उपलब्ध करून दिले. सोलापूरच्या खवैय्यांना या माध्यमातून इटालियन खाद्य प्रकार चाखण्यास मिळाले. या उपक्रमाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. 

पुढील शिक्षणही सुरु 

आता हे क्‍लाऊड किचन चालवत असताना मयंकने पुढील शिक्षणदेखील घ्यायचे ठरवले आहे. 
मात्र ग्राहकांचा सध्याचा प्रतिसाद पाहून आता पुढील काळात पुणे किंवा मुंबईसारख्या शहरात करिअर न करता सोलापुरातच कायम राहून आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थाची रेंज शहरात उपलब्ध करुन द्यायची. त्यासाठी वेळ पडल्यास परदेशात जाऊन विशेष शिक्षण मिळवायचे, असा निर्धार त्यांनी केला आहे. 

 
सोलापुरात राहूनच स्वतःचे क्‍लाऊड किचन

करिअरच्या संधी भरपूर असल्या तरी मी सोलापुरात राहूनच स्वतःचे क्‍लाऊड किचन चालवण्याचे ठरवले आहे. तसेच सोलापूर हे शहर आंतरराष्ट्रीय फूड प्रकारासाठी ओळखले जावे, असा प्रयत्न करणार आहे. 
-मयंक अग्रवाल, युवक, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com