सोलापूरकरांनो, "या' ठिकाणी जमा करा तुमच्याकडील गणेशमूर्ती 

तात्या लांडगे 
Saturday, 29 August 2020

महापालिका प्रशासनाने घरगुती व छोट्या-मोठ्या गणेशोत्सव मंडळांकडील मूर्तींच्या संकलनाचे ठोस नियोजन केले आहे. त्यानुसार प्रत्येक झोनमधील नागरिकांनी कोणत्या ठिकाणी मूर्तींचे संकलन करावे, त्याची ठिकाणे महापालिकेने ठरवून दिली आहेत. या वेळी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

सोलापूर : कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन आणि मिरवणुकीस परवानगी देण्यात आलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने घरगुती व छोट्या-मोठ्या गणेशोत्सव मंडळांकडील मूर्तींच्या संकलनाचे ठोस नियोजन केले आहे. त्यानुसार प्रत्येक झोनमधील नागरिकांनी कोणत्या ठिकाणी मूर्तींचे संकलन करावे, त्याची ठिकाणे महापालिकेने ठरवून दिली आहेत. या वेळी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. संकलित मूर्ती महापालिकेच्या यंत्रणेद्वारे उचलल्या जाणार असून, सर्व मूर्तींचे विसर्जन एकाचवेळी केले जाणार आहे. 

हेही वाचा : तीन दिवसांच्या कलाकारांची पाठ यंदा कोण थोपटणार? सजीव देखाव्यांअभावी पूर्वभागात सन्नाटा 

विभागीय कार्यालय - एक (29 ठिकाणे) 
लमाण तांडा (झेडपी शाळा, केगाव), शिवाजी नगर (गणेश मंदिर), खडक गल्ली (झेडपी शाळा, बाळे नागरी आरोग्य केंद्राजवळ), श्रद्धा एलिगन्स, अंबिका नगर (झेडपी शाळा), अंबाबाई मंदिर, ज. रा. चंडक प्रशाला (बाळे कॉर्नर), प्रसन्न मल्टिपर्पज हॉल (जिव्हाळा, मतिमंद शाळा), वारद फार्म (झेडपी शाळा), पांढरे वस्ती (झेडपी शाळा), जगेश्‍वर लिंग (नाकोडा), महादेव मंदिर (अनंत नामेश्‍वर लिंग), मनपा शाळा (पत्रा तालिमशेजारी), इंदिरा कन्या प्रशाला, मनपा शाळा क्र. 13, चौपाड आणि मनपा शाळा उर्दू शाळा - 36 (रामलाल चौक), मनपा शाळा क्र. 12 (उद्यान कार्यालय, डॉ. कोटणीस स्मारक, भय्या चौक), मनपा हायर प्रायमरी शाळा (सेवासदन प्रशाला संकुलाजवळ), गणेश हॉल (हुतात्मा स्मृती मंदिर, नॉर्थकोट प्रशाला), शरदचंद्र पवार शाळा, मनपा शाळा क्र. 28, जुनी पोलिस लाइन (विठ्ठल मंदिर, समाज मंदिर), व्ही. के. हॉल (देवेंद्र कोठे यांच्या घराशेजारी), छत्रपती संभाजी तालीम, मनपा शाळा क्र. 21, मादगी समाज मंदिर (सफाई कामगार वसाहत), दमाणी शाळा (जैन गुरुकुल प्रशाला). 

हेही वाचा : राजकीय आडोशाला खाकीचा गोरख धंदा! "या' शहरात 15 दिवसांत चार पोलिस निलंबित 

विभागीय कार्यालय - दोन (12 ठिकाणे) 
रोशन प्रशाला, अंबिका समाज मंदिर (राजीव किसान नगर), नागनाथ अल्ली महाराज, सोशल उर्दू शाळा, संभाजीराव शिंदे प्रशाला, राज मेमोरिअल इंग्रजी शाळा, जिल्हा परिषद शाळा (दहिटणे), झेडपी शाळा (शेळगी), जोशी गल्ली (रविवार पेठ), प्रभाकर महाराज मंदिर, आम्रपाली चौक, मड्डी वस्ती (हनुमान मंदिर, तुळजापूर नाका). 

झोन कार्यालय - तीन (10 ठिकाणे) 
मनपा जयभावानी प्रशाला, मनपा शाळा क्र. दोन (ढोर गल्ली), विभागीय कार्यालय क्र. तीन, गांधी नगर क्र. तीन (समाज मंदिर), रविवार पेठ (मनपा शाळा क्र. दोन), मनपा शाळा क्र. आठ, विभागीय कार्यालय क्र. दोन (रविवार पेठ), ललितांबा मंदिर, स्वातंत्र्य सैनिक नगर (एसआय ऑफिस), जिजामाता बाग (पावन गणपतीजवळ). 

झोन कार्यालय- चार (12 ठिकाणे) 
मार्कंडेय नगर (झेडपी शाळा), माधव नगर (पद्ममारुती मंदिर), बुर्ला मंगल कार्यालय, गणेश मंदिर (बोमड्याल शाळेजवळ), मित्रगोत्री पाण्याची टाकी, बोल्ली मंगल कार्यालय (अशोक चौक), झेडपी शाळा (नीलम नगर), साने गुरुजी प्रशाला (बत्तुल प्रशालेजवळ), नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांचे संपर्क कार्यालय, देवराज प्रशाला (शांती नगर पाण्याची टाकीसमोर), केंगनाळकर शाळा, एसपीएम कॉलेज (कुमठा). 

झोन कार्यालय - पाच (12 ठिकाणे) 
बालाजी मंगल कार्यालय, गोविंदश्री मंगल कार्यालय, कुसमराज मंगल कार्यालय, पोष्ट बेसिक शाळा, व्ही. जी. शिवदारे कॉलेज, कुबेर लक्ष्मी लॉन्स, समृद्धी गार्डन, राजस्व नगर सांस्कृतिक भवन, किल्लेदार मंगल कार्यालय, सौ. रुखमाबाई मंगल कार्यालय, स्हेनपुष्प मंगल कार्यालय, मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन. 

झोन क्र. सहा (सात ठिकाणे) 
सुंदराबाई डागा प्रशाला (दमाणी नगर), झेडपी शाळा (देगाव), मराठी कन्नड उर्दू मुलांची शाळा क्र. तीन, थोबडे वस्ती (समाज मंदिर), मनपा शाळा क्र. 28, उत्कर्ष नगर शाळा क्र. चार, जांबुमनी समाज मंदिर. 

झोन क्र. सात (सहा ठिकाणे) 
मनपा शाळा क्र. तीन (दत्त चौक परिसर), ढोर गल्ली समाज मंदिर (शुक्रवार पेठ), मनपा मुलींची उर्दू शाळा क्र. एक (बेगम पेठ पोलिस चौकीसमोर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा (एम्प्लॉयमेंट चौक), मनपा शाळा (मोदी, सातरस्ता), मनपा शाळा (रामवाडी). 

झोन क्र. आठ 
मनपा शाळा क्र. सहा, स्वीमिंग टॅंकशेजारी (एमपीएससी हॉल), मनपा शाळा उर्दू शाळा क्र. पाच (शुक्रवार पेठ), इंडोअर स्टेडिअम, सातरस्ता बस डेपो (एसआय ऑफिस), महाराणा प्रताप समाज मंदिर 14 नंबर शाळा, ललित कला भवन (सतनाम चौक), स्वीमिंग टॅंक (एसआय ऑफिसजवळ), मनपा शाळा क्र. पाच, गुरुनानक चौक (एसआय ऑफिस), कॅम्प शाळा, मुदगल बाग (समाज मंदिर), भारतरत्न इंदिरा नगर (सत्तरफूट रोड, मस्जिदशेजारील समाज मंदिर), महादेव मंदिर समाज मंदिर, एसटी स्टॅण्ड क्र. दोन (समाज मंदिर). 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zone wise collection of Ganesh idols in Solapur city