जि.प.उपाध्यक्ष चव्हाण यांच्या पुढाकाराने बंद भोसे योजनेला चालना

dilip chavan zp .jpg
dilip chavan zp .jpg

मंगळवेढा (सोलापूर) ः  सात,महिने बंद असलेल्या भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालविणे व देखभाल दुरुस्तीसाठी र.रु. 18 लक्ष 60 हजार ची तरतूद जि.प.ने करुन त्याचे कार्यारंभ आदेश दिल्याची माहिती माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडे असलेली ही योजना आठ महिन्यापूर्वी जि.प.कडे काम अर्धवट ठेवून शिवाय थकबाकी वसुली बाबत ठोस निर्णय न घेता हस्तातरीत करण्यात आली.वीज बील व इतर कारणाने बंद असलेली योजना सुरू करण्यासाठी सेस फंडातून जि.प.उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या पुढाकारातून तरतूद केल्याने योजना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या निविदेमध्ये योजना चालविण्याकामी पाणी उपसा केंद्र व जलशुध्दिकरण केंद्र येथे पंप ऑपरेटर, फिटर व मजूर पूरविणे तसेच 40 गावच्या टाक्यामध्ये पाणी भरणेकामी लागणारे व्हाल्व ऑपरेटर करणारे मजूर तसेच अस्तित्वातील पाईपलाईनची किरकोळ दुरुस्ती करणे इ. कामांचा या निविदेमध्ये समावेश आहे.

तालुक्यातील गोणेवाडी, पाटखळ, खुपसंगी, डोंगरगाव, शिरशी, जुनोनी, खडकी, मेटकरवाडी, हाजापूर, हिवरगाव, लेंडवेचिंचाळे, नंदेश्वर, सिध्दनकेरी, जालिहाळ, रेड्डे, चिक्कलगी, भोसे, हुन्नूर, निंबोणी, जित्ती, मानेवाडी, खवे, बावची, लोणार, महमदाबाद, शिरनांदगी, भाळवणी, पडोळकरवाडी, जंगलगी, पौट, हुलजंती, माळेवाडी, सलगर खुर्द, येळगी, सोड्डी, मारोळी, लवंगी, सलगर बु. आसबेवाडी व शिवनगी या गावाना पाणी मिळणार आहे.
या योजनेचे देखभाल दुरूस्ती व वीज भरण्यासाठी शिखर समिती स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु यातील काही गावात प्रशासक व आचारसंहितेचा फटका बसला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने काम अर्धवट ठेवून हस्तातरीत केली.परंतु जि.प.ने तरतूद केल्यामुळे सुरू होणार आहे.परंतु यापुढील काळात पाणी पुरवठा केल्यानंतर शिखर समितीच्या माध्यमातून वसुली जबाबदारी वाढणार आहे.योजना हस्तातरीत करण्यापूर्वी सिमावर्ती भागात पाणी मिळत नव्हते त्या गावाला आता पाणी दिले जाणार आहे. दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे देखील ही योजना सुरू करण्यासाठी सातत्याने उपाध्यक्ष चव्हाण यांच्या संपर्कात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com