"झेडपी' खरेदी करणार 1029 रुपयांचे पीपीई कीट 

"झेडपी' खरेदी करणार 1029 रुपयांचे पीपीई कीट 

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एक हजार 29 रुपयांना पीपीई कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर थर्मल गनसाठी चार हजार 400 रुपये मोजण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाला कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर साहित्य खरेदीसाठी सात कोटी 87 लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या माध्यमातून मिळाला आहे. 

जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागावर ताशेरे ओढल्यानंतर या विभागाने कोणते साहित्य खरेदी केले. त्याची यादी जाहीर केली आहे. त्या यादीमध्ये कोणत्या वस्तूसाठी किती रुपये मोजण्यात येणार आहेत हेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कोरोना प्रतिबंधीत साहित्य खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटी 54 लाख 63 हजार, आमदार फंडातून दोन कोटी 32 लाख 53 हजार तर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पैशातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करणे सुरु केले आहे. 

सात कोटी 87 लाख रुपयांच्या निधीमधून पाच कोटी 84 लाख रुपयांच्या साहित्य खरेदीच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. 29 लाख रुपयांच्या साहित्याची खरेदी टेंडर प्रक्रियेमध्ये असल्याचेही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. एक हजार 29 रुपये किमतीचे असलेले पीपीई कीट जिल्हा परिषदेने घेतले आहेत. त्या कीटची संख्या चार हजार 150 इतकी आहे. 68 रुपये 25 पैशाला एन-95 मास्क घेतले आहेत. त्या मास्कची संख्या 10 हजार इतकी आहे. 17 हजार 464 रुपयांप्रमाणे 77 फवारणी यंत्रांची खरेदीही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. एन-95 मास्कसह असलेले पीपीई कीट 812 रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. त्याची संख्या तीन हजार इतकी आहे. 

आमदार फंडातून खरेदी केलेल्या साहित्याचे दर 
पीपीई कीट-812, सॅनिटायझर 500 मिली-245, तीन पदरी मास्क-11 रुपये 55 पैसे, रबर ग्लोज 16 रुपये आठ पैसे, थर्मल स्कॅनर-चार हजार 400 रुपये, नेब्युलायझर अल्ट्रासॉनिक-सात हजार 728 याप्रमाणे साहित्याची खरेदी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com