खंडकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आमदार भरणेंनी घेतली महसूलमंत्र्याची भेट

राजकुमार थोरात
बुधवार, 20 जून 2018

वालचंदनगर : खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मंगळवार (ता.१९) रोजी भेट घेवून खंडकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली. महसुलमंत्र्यांनी खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली. 

वालचंदनगर : खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मंगळवार (ता.१९) रोजी भेट घेवून खंडकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली. महसुलमंत्र्यांनी खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली. 

खंडकरी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित आहेत. यामध्ये खंडकरी शेतकऱ्यांना १९७२ व १९७८  मध्ये वाटप करण्यात आलेल्या जमीनीवरील वर्ग-२ शेरा काढण्यात यावा. २०१४ वाटप करण्यात आलेल्या खंडकऱ्यांना कालव्याच्या पाण्याचा हक्क देण्यात यावे. खंडकरी शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळण्यास अडचणी होत असून तातडीने विद्युत रोहित्र मिळावे. अनेक खंडकरी शेतकऱ्यांना वाटपात अडथळे आले असून जमीन न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने जमिनीचे वाटप करावे. खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींची सरकारी मोजणी करून देण्यात यावी, तसेच या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात यावे. अनेक शेतकऱ्यांना अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला असून तो मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. 

महसूलमंत्र्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना सुचना देवून खंडकऱ्यांच्या प्रश्‍नासंदर्भात पुणे येथे शेती महामंडळाचे अधिकारी, खंडकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी यांची एकत्रितपणे बैठक घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त डी.जी.म्हैसकर, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब भागडे, महसूलचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, महसूलचे उपसचिव एस.बी.पाटणकर, शेती महामंडळाच्या मुख्य कार्यकारी प्रशासन अधिकारी वर्षा उंटवाल, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, खंडकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अॅड. तेजसिंह पाटील, हर्षवर्धन गायकवाड, सुहास डोंबाळे, प्रदीप पाटील, अशोक पाटील, अॅड.पांडुरंग गायकवाड उपस्थित होते.

कामगारांना घरे बांधून द्या - भरणे 

शेती महामंडळामधील कामगारांचे ही अनेक प्रश्‍न प्रलंबित बसून कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच त्यांना घरे बांधून द्यावीत. शेती महामंडळामध्ये नोकर भरती करताना जुन्या हंगामी कर्मचाऱ्यांचा विचार करण्याची मागणी भरणे महसूलमंत्र्याकडे केली आहे. 

Web Title: A meeting of Revenue Minister took charge of the MLAs for the issue of farmers land