#SaathChal अवघा रंग एक झाला...

सचिन शिंदे
Friday, 20 July 2018

बोरगाव - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगावकडे मार्गस्थ झाला. सकाळी आठच्या सुमारास माळीनगर येथे कोवळे ऊन अंगावर घेत पहिला उभा रिंगण सोहळा रंगला. रिंगण सोहळ्याचा आनंद घेतल्यानंतर तेथेच झालेल्या पहिल्या विसाव्याला ‘अवघा रंग एक झाला... रंगी रंगला श्रीरंग,’ अशीच भावना घेऊन साठीतील चार महिलांचा गट अभंगात दंग झाला होता. त्यात वारीत बंदोबस्तावर असणाऱ्या गृहरक्षक दलाच्या महिला जवानही होत्या. त्याही वारकरी होत्या. सोहळ्यात प्रत्यक्ष पांडुरंगच आमच्यासोबत चालतोय, अशी आमची भावना आहे, असे त्या महिलांनी सांगितले.

अकलूजचे कालचे गोल रिंगण व दिवसभराचा विसावा आटोपून सकाळी सहाच्या सुमारास पालखी सोहळा मार्गस्थ झाला. चार ते पाच किलोमीटरचा टप्पा ओलांडून सोहळा माळीनगरला पोचला. तेथे पेट्रोल पंपासमोर रस्त्यावरच उभे रिंगण लागले. मधोमध पालखी उभी केली. त्याच्याकडेने सुमारे दोन किलोमीटरपर्यंत दिंड्या उभ्या राहिल्या. काही वेळाने मधून अश्व धावले.

वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर केला. दोन फेऱ्यांनंतर रिंगण संपले. वारकऱ्यांनी वेगवेगळे खेळ सुरू केले. त्यात साठीतील हौसाबाई शेषराव घुले, द्वारका गोरख वारे, दगडाबाई सुधाकर क्षीरसागर व आशाबाई विठ्ठल खेडकर यांनी अभंगाचा ठेका धरला होता.

वारीत आज
    तोंडलेबोंडले (जि. सोलापूर) येथे धावा
    पिराची कुरोली येथे मुक्काम

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal palkhi wari sant tukaram maharaj