#SaathChal ‘आषाढी वारी २०१८’ मोबाईल ॲप उपयुक्त

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 12 जुलै 2018

सातारा - माउलींची पालखी शुक्रवारपासून (ता. १३) सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. हा पालखी सोहळा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्कामाला असणार आहे. वारीमार्गात संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालख्या नेमक्‍या कोठे आहेत हे भाविकांना समजावे, तसेच वारकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबर विविध प्रकारची माहिती मिळावी, यासाठी ‘आषाढी वारी २०१८’ हे मोबाईल ॲप उपयुक्त ठरत आहे. 

सातारा - माउलींची पालखी शुक्रवारपासून (ता. १३) सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. हा पालखी सोहळा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्कामाला असणार आहे. वारीमार्गात संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालख्या नेमक्‍या कोठे आहेत हे भाविकांना समजावे, तसेच वारकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबर विविध प्रकारची माहिती मिळावी, यासाठी ‘आषाढी वारी २०१८’ हे मोबाईल ॲप उपयुक्त ठरत आहे. 

पंढरीच्या वारीनिमित्त पुणे जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ‘आषाढी वारी २०१८’ हे ॲप तयार केले आहे. एक जुलैपासून आजपर्यंत ‘प्ले स्टोअर’मधून सुमारे ५० हजारपेक्षा अधिक नागरिकांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड केले आहे. या ॲपच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबर विविध प्रकारची माहिती मिळत आहे. पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेसह आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना महत्त्वाचे संदेश ही मिळत आहेत. याबरोबरच ॲपमध्ये पालखी मार्गात विसाव्याचे ठिकाण, पाणीपुरवठ्याचे ठिकाण, समन्वय कक्ष, गॅस आणि रॉकेल मिळण्याचे ठिकाण, टॅंकरची सुविधा, शौचालय आदी ठिकाणे यांची जीपीएस लोकेशन उपलब्ध आहेत.

पालख्यांचा मार्ग, वैद्यकीय सेवा, अन्नधान्य पुरवठा व वितरण, विद्युत सेवा, आपत्कालीन सेवा याबाबतची माहिती व अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध आहेत. 

पुण्याहून सोलापूर जिल्ह्यापर्यंत जाणाऱ्या या पालख्यांमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी असतात. काही वेळेला ज्येष्ठ नागरिक, तसेच लहान मुले यांची नातेवाइकांपासून चुकामूक होते. त्यामुळे हरविलेल्या व्यक्तींचे नाव, कायमचा पत्ता व संपर्क क्रमांक यामध्ये नोंदविण्यात येणार आहे. जेणेकरून एखाद्या व्यक्तीस संबंधित (हरवलेली) व्यक्ती नजरेस पडली तर नातेवाईकांशी संपर्क साधता यावा. पुणे, सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस यंत्रणा यांच्या माध्यमातून हे ॲप सातत्याने अपडेट होत राहणार आहे.

एक जुलैपासून आजपर्यंत ‘प्ले स्टोअर’मधून सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी हे ॲप मोबाईलवर डाउनलोड केले आहे. ‘ॲप’च्या माध्यमातून वारकऱ्यांना सुविधा देता येत आहेत. विशेष म्हणजे पंढरपूर येथून विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येत असल्याने भक्तांना परमानंद होत आहे.
- डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi aashadhi wari 2018 mobile app