करमाळा बँक दुर्घटनेत एक मृत्यूमुखी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सकाळी 11 वाजता ही घटना घडली आहे. दुर्घटना घडली तेव्हा बँकेत 50 पेक्षा जास्त लोक होते. जेसीबी, क्रेनच्या मदतीने अडकलेले लोक बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बँक तळमजल्यावर असून वरती दवाखाना आहे. दवाखान्याच्या पुढील बाजुचे स्लॅब कोसळून हा अपघात झाला आहे. 

करमाळा (सोलापूर) : येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात क्लार्क प्रशांत बागल यांचा मृत्यू झाला आहे. छताच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकल्याची भिती होती. ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे. 

सकाळी 11 वाजता ही घटना घडली आहे. दुर्घटना घडली तेव्हा बँकेत 50 पेक्षा जास्त लोक होते. जेसीबी, क्रेनच्या मदतीने अडकलेले लोक बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. बँक तळमजल्यावर असून वरती दवाखाना आहे. दवाखान्याच्या पुढील बाजुचे स्लॅब कोसळून हा अपघात झाला आहे. 

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे उपस्थित असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 die in Bank of maharashtra slab collapsed