दुचाकी-मालट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू

राजकुमार शहा 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मोहोळ : मोटार सायकल व मालट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. 10) सकाळी पावणेदहा वाजता सावळेश्वर फाट्याजवळ झाला. गुरुप्रसाद हरिभाऊ संगीतराव पंढरपुर असे मृताचे नाव असुन रामदास शिवाजी पिलवे (रा. कासेगाव), बाबुलाल शेख (रा. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. मृत संगीतराव हे सोलापूर येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या साखरपेठ शाखेतील वरिष्ठ लेखापाल आहेत.

मोहोळ पोलीसाकडुन मिळालेल्या माहिती नुसार मृत संगीतराव व जखमी पिलवे हे मोटार सायकल क्र एमएच 13 बीजी 8521 वरून सोलापूरला निघाले होते, तर मालट्रक क्र एमएच 12 केपी 250 ही सोलापूराहुन पुण्याच्या दिशेने निघाली होती. दोन्ही वाहने सावळेश्वर फाट्याजवळ येताच मालट्रक रस्त्यावरील दुभाजक तोडुन, दर्ग्यावरून चुकीच्या बाजुने जाऊन मोटार सायकलला जोराची धडक दिली, त्यात गुरूप्रसाद संगीतराव हे गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत पावले, तर जखमी ना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद मोहोळ पोलीसात झाली असुन तपास हवालदार अविनाश शिंदे करीत आहेत.

Web Title: 1 died in the accident two wheeler and truck