"आयपीएल'वर सट्टा; 10 जणांना पकडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

श्रीगोंदे - "आयपीएल'मधील बंगळुरू व सनराइज हैदराबाद यांच्यातील क्रिकेट सामन्यावर गुरुवारी रात्री सट्टा खेळताना काष्टीत 10 जणांना पोलिसांनी पकडले. कृषी साहित्याच्या विक्रीच्या दुकानात हा सट्टा खेळला जात होता. पोलिसांनी छापा घालून 39 हजार रुपयांसह 72 हजारांचे साहित्य जप्त केले. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सांगितले, की काष्टीतील तुळसाईनगर येथील महालक्ष्मी ठिबक सिंचन दुकानात "आयपीएल' सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घातला.
Web Title: 10 arrested by IPL beating crime