कार्यालय फोडून दहा लाखाची रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय चोरट्यांनी फोडून सुमारे सहा लाखांची रोकड लंपास केली. मलकापूर येथे काल रात्री उशिरा ही घटना घडली. ती आज सकाळी उघडकीस आली. श्वान व ठस  तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. तेथे काही ठसे मिळाले आहेत. मात्र श्वानाचा फारसा उपयोग झाला नाही.

कऱ्हाड - बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय चोरट्यांनी फोडून सुमारे सहा लाखांची रोकड लंपास केली. मलकापूर येथे काल रात्री उशिरा ही घटना घडली. ती आज सकाळी उघडकीस आली. श्वान व ठस  तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. तेथे काही ठसे मिळाले आहेत. मात्र श्वानाचा फारसा उपयोग झाला नाही.

मलकापूर येथे बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय हणमंत देसाई यांचे कार्यालय आहे. त्यामध्ये त्यांनी मजुरांची दैनंदिन कामाची मजुरी, बिल्डिंगचे साहित्य खरेदी केलेले पैसे देण्यासाठी, तसेच उसनवारी घेतलेले पैसे अशी 5 लाख 90 हजार एवढी रक्कम कार्यालयात आणून ठेवली होती. ही रक्कम चोरट्यांनी लंपास केली.याबाबत देसाई यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: 10 lack rs. theft in karad taluka