
कोल्हापूर : ग्रामीण भागातील गरोदर मातांना रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी जननी सुरक्षा योजने अंर्तगत 102 टोल फ्री क्रमाकांची रूग्णवाहिका सेवा सुरू केली. मात्र, विविध उणिवांच्या गर्तेत सापडलेल्या या रूग्णवाहिकांचा वापर उपचारपूरक साधनसामुग्रीच्या वाहतुकीसाठी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या रूग्णवाहिकांच्या वापराचा उद्देशालाच खीळ बसली आहे. आरोग्य विभागाची सेवा असतानाही कंत्राटी पद्धतीच्या रूग्णवाहिकांची सेवा घेण्याची वेळ आली आहे.
जननी सुरक्षा योजना गरोदर मातांसाठी आहे. त्यात मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून सुरक्षित बाळंतपण व्हावे, नवजात अभ्रकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे. बाळ, बाळंतीनीस कुपोषण टाळून पुढे तंदुरस्त आरोग्य लाभावे. यासाठी आशा कर्मचाऱ्यांमार्फत गरोदर मातांना नियमित देखरेख व उपचारपूरक मदत केली जाते. गरोदर मातांना निमयमितपणे शासकीय रूग्णालयाकडून उपचार व वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याबाबत पाठपुरावा केला जातो.
हे पण वाचा - भीषण अपघातात जयसिंपूरचे तीन मित्र ठार...
जिल्ह्यातील प्रत्येक मोठे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय आहेत. त्या प्रत्येक केंद्राला एक याप्रमाणे 102 टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका सेवा आहे. साधारण दहा वर्षापूर्वी सुरू झालेली ही सेवा गरोदर मातांसाठी वरदान ठरली. मात्र, 108 रूग्णवाहिकांची सेवा सुरू झाल्यानंतर पाच वर्षात 102 रूग्णवाहिकांकडे दुर्लक्ष झाले.
जिल्हाभरात 30 ते 40 रूग्णवाहिका आहेत. परिसरातील जखमी, गंभीर आजारी रूग्ण महिला असो वा गरोदर मातांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्याचे प्रमाण कमी होत आहे. अनेकदा चालक आहेत तर इंधन नाही, इंधन व चालक असेल तर गाडी नादूरूस्त आहे, अशी स्थिती बहुतेक गाड्यांची आहे. तर काही वेळा गाडी किंवा आरोग्य केंद्रातील कर्मचारी त्यात स्वतः पैसे घालून इंधन घालतात. त्यानंतर पैसे त्यांना शासनाकडून मिळतात, असाही प्रकार घडल्याचा अनुभव सांगण्यात येतो. पूर्वी यातील काही गाड्यांमध्ये स्ट्रेचर होते. आता तेही काढून त्याऐवजी बसण्यासाठी सिट बसविल्या आहेत. त्यामुळे गरोदरमातांना आरामदायी अवस्थेत रूग्णालयापर्यंत या रूग्णवाहिकेतून पोहचविता येत नाही.
या सर्व अडचणींमुळे बहुतांशी वेळा ग्रामीण भागातील गरोदर मातेला प्रसुती वेदना सुरू झाल्यास 108 रूग्णवाहिकेस फोनकरून बोलवावे लागते. या रूग्णवाहिकेत डॉक्टर आहेत. त्यामुळे त्याच्या सोबत गरोदर मातेला रूग्णालयात आणले जाते. या साऱ्यात गरोदर मातांना रूग्णालयात आणण्यासाठी सर्वाधिक प्रमाणात 108 रूग्णवाहिकांचा वापर होत आहे. त्यात आरोग्य जननी सुरक्षा योजनेचा 102 रूग्णवाहिका वैद्यकीय साधनसामुग्रीची ने आण करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना दौऱ्यांवर घेऊन जाणे अशा कामासाठी वापरल्या जातात.
शासनाला खर्चाचा भुर्दंड
108 रूग्णवाहिकांची सेवा सक्षम व चांगल्या प्रकारे दिली जाते. दिवसाला कमीत कमी 10 ते 12 गरोदर मातांना रूग्णालयात आणण्याचे काम करतात. एक गरोदर मातांना रूग्णालयात पोहचवून रूग्णवाहिका परत येण्यासाठी कमीत कमी 1 तास ते दोन तास जातात. एवढ्या वेळेत आणखी कुठेतरी जखमींना न्यायची वेळ आल्यास दुसऱ्या भागातील 108 रूग्णवाहिका पाठवावी लागते. वास्तवीक गरोदर मातांसाठी 102 रूग्णवाहिकेची सुविधा असताना ती सक्षम नसल्यामुळे 108 चा वापर करावा लागतो यात शासनाच्या पैशाचा अपव्यय तर होत नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.