ब्रेकिंग ; सांगलीत कोरोनाचा कहर ; दिवसभरात शंभरी पार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

महापालिका क्षेत्रात 79 आणि ग्रामीण भागातील 27 रुग्णांचा समावेश आहे.

सांगली - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने आज कहर केला. जिल्ह्यात आज कोरोनाचे 106 रुग्ण सापडले. त्यातील महापालिका क्षेत्रात 79 आणि ग्रामीण भागातील 27 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजअखेर 42 जणांचा कोरोनामुळे बळी गेलेत. त्यात मिरजेतील समतानगरातील एकाचा तर अन्य तिघे परजिल्ह्यातील आहेत. त्यात कुरुंदवाड येथील दोन तर दोपोली येथील एकाचा समावेश आहे. 

आज कोरोना रुग्णामध्ये मिरज तालुक्‍यातील 7, खानापूर तालुक्‍यातील 6, जत तालुक्‍यातील 5, आटपाडी व वाळवा तालुक्‍यातील प्रत्येकी 3 , कडेगाव, शिराळा, तासगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आजअखेर कोरोना बाधितांची संख्या 1214 झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आपत्ती निवारणासाठी आलेल्या एनडीआरएफ आष्टा येथील पथकांतील एका जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. 

मिरजेतील समतानगरातील 57 वर्षाच्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परजिल्ह्यातील कुरुंदवाड ( ता. शिरोळ) येथील 65 वर्षाचा पुरुष आणि 58 वर्षीय महिलेचे निधन एका खासगी रुग्णालयात झाले. दापोली ( जि. रत्नागिरी) येथील 60 वर्षाच्या पुरुषाचे उपचारा दरम्यान एका खासगी रुग्णालयात निधन झाले. 

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोनाने कहर केला. त्यात सांगली शहरातील 63 आणि मिरज शहरातील 16 रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील आष्टा येथे महापूर आपत्ती निवारणासाठी दाखल झालेल्या एनडीआरएफ पथकांतील एका जवानाला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. मिरज तालुक्‍यात आज सर्वाधिक म्हणजे 7 रुग्ण सापडले. त्यात 

 ह पण वाचा - सीईटीची मार्गदर्शक तत्वे जाहीर, 30-31 ला होणार परीक्षा

 

 195 जण कोरोनामुक्त 
जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. एकीकडे नवे रुग्ण दाखल होत असताना बुधवारी तब्बल 195 जण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 106 new corona positive patient fund in sangli