राज्यातील 1097 वाड्या-पाडे स्वातंत्र्यापासून अंधारातच 

तात्या लांडगे
शनिवार, 9 जून 2018

सोलापूर : स्वातंत्र्योत्तर काळापासून वीज नसलेल्या राज्यातील एक हजार 97 वाड्या-पाड्या अद्यापही अंधारातच आहेत. त्याठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आता महावितरण आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून वीज जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. डिसेंबर 2018 पर्यंत या सर्व वाड्या-वस्त्यांवर वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह अन्य विकसित जिल्ह्यांमधील काही वाड्या-वस्त्यांवर अद्यापही वीज पोचलेली नाही. महाऊर्जामार्फत 776 तर पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत 222 वाड्या-पाड्यांवर आणि उर्वरित 99 वाड्या-वस्त्यांवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वीजजोडणी केली जाणार आहे. स्वातंत्र्यापासून ज्या दुर्गम भागात वीज पोचलेली नाही अशा ठिकाणी महाऊर्जामार्फत तर शक्‍य असलेल्या भागात महावितरणच्या वतीने वीज देण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. 

राज्यात एकूण एक लाख 639 वाड्या-पाडे असून त्यापैकी 99 हजार 370 वाड्या-पाड्यांवर वीज पोचली आहे. आता उर्वरित ठिकाणी डिसेंबर 2018 पर्यंत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सध्या काम सुरू आहे. 
- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

Web Title: in 1097 remote parts of maharashtra is still suffers no electricity