जि.प.च्या १३६ उमेदवारांची अनामत जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसप, मनसेसह इतर पक्षांच्या एकूण १३६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. आजरा तालुका वगळता या उमेदवारांची एकूण १ लाख ९ हजार रुपये अनामत रक्कम जप्त झाली आहे. 

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान, अनामत जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बहुजन समाज पार्टी व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांना ‘नोटा’ वगळून झालेल्या मताच्या एक अष्टमांश मते न मिळाल्यास अनामत रक्कम जप्त होते.

जिल्हा परिषदेच्या खुल्या वर्गासाठी एक हजार तर राखीव वर्गासाठी पाचशे रुपये अनामत रक्कम स्वीकारली होती. करवीर तालुक्‍यातील सर्वाधिक ३८ उमेदवारांची ३७ हजार ५०० रुपये अनामत जप्त झाली आहे. करवीरसाठी एकूण ११ गटांसाठी लढत झाली. हातकणंगले तालुक्‍यातील ११ गटातील २२ उमेदवारांची १५ हजार ५०० रुपये, शाहूवाडीतील ४ गटांतील ७ उमेदवारांची ६ हजार रुपये, पन्हाळ्यातील ६ गटांतील १५ उमेदवारांची १३ हजार रुपये, कागल तालुक्‍यातील ५ गटातून ९ उमेदवारांची ९ हजार रुपये, भुदरगड तालुक्‍यातील ४ गटातील ९ उमेदवारांची ९ हजार रुपये, गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ८० टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले, तरीही या ठिकाणच्या २ गटांतील ४ उमेदवारांना ४ हजार रुपयांची अनामत गमवावी लागली. गडहिंग्लज तालुक्‍यातील ५ गटातील ५ उमेदवारांची ३ हजार ५०० रुपये, चंदगड तालुक्‍यातील १० उमेदवारांची ९ हजार रुपये, शिरोळ तालुक्‍यातील ७ गटातील १० उमेदवारांची ८ हजार रुपये, शाहूवाडी तालुक्‍यातील ४ गटातील ७ उमेदवारांची ६ हजार रुपये व राधानगरी तालुक्‍यातील ५ गटातील ७ उमेदवारांची ४ हजार ५०० रुपये रक्कम जप्त 
झाली आहे.

Web Title: 116 zp candidate deposit seized