सहा डिसेंबरसाठी 12 अनारक्षित रेल्वे गाड्या

रजनीश जोशी
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

■ सोलापूर-मुंबईसाठी दोन रेल्वे

■ 16 जनरल द्वितीय श्रेणीचे डबे जोडणार

■ नागपूर-मुंबईसाठी तीन, मुंबई-नागपूर सहा गाड्या

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला नागपूरला जाणाऱ्यांसाठी रेल्वेने 12 विशेष गाड्यांची सोय केली आहे. त्यामध्ये नागपुरहून मुंबईसाठी तीन, मुंबईहून नागपुरसाठी सहा तर अजनीहून मुंबईसाठी एक आणि सोलापुरहून मुंबईसाठी दोन विशेष अनारक्षित गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
 

हेही वाचा -

डाळिंबाने भरलेला ट्रक मध्येच केला लंपास

नागपूर-मुंबई या विशेष रेल्वेला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामनगांव, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, जलंब, मलकापुर, भुसावल, जलगांव, चालिसगांव, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला 16 जनरल द्वितीय श्रेणीचे डबे जोडले जाणार आहेत. तर मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या रेल्वे गाडीलाही 16 डबे असणार आहेत.

जाणून घ्या -

वडगाव शिवारात जलसमृद्धी

या रेल्वेला दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नासिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापुर, जळंब, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम तथा अजनी अशी धावणार आहे. तर अजनी ते मुंबई सुपरफास्ट अनारक्षित विशेष रेल्वे वर्धा, पुलगांव, धामनगांव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापुर, भुसावल, जलगांव, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण तथा दादर अशी धावणार आहे. तत्पूर्वी, मध्य रेल्वे विभागाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी या उद्देशाने भुसावळ- मुंबई व मुंबई- भुसावळ पॅसेंजरला 5 डिसेंबरला दोन जनरल डबे वाढविले जाणार आहेत. तसेच श्री. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महालक्ष्मी एक्‍सप्रेसला एक जनरल डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 

सोलापुरातून विशेष रेल्वेची सोय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरला जाणाऱ्यांसाठी सोलापुकरांसाठी मुंबईपर्यंत दोन विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. पहिली विशेष गाडी 5 डिसेंबरला सोलापुरातून सायंकाळी 5.20 वाजता निघेल आणि दुपारी 1.20 वाजता मुंबईत पोहचेल. त्यानंतर 7 डिसेंबरला मुंबईहून रात्री 12.25 लाख निघणारी ही गाडी सकाळी 10.10 वाजता सोलापुरला पोहचेल, असे नियोजन करण्यात आले आहे. या रेल्वेला 12 जनरल डबे असणार आहेत. कुर्डूवाडी, दौण्ड, पुणे, लोनावळा, कर्जत, कल्याण, दादर या ठिकाणी ही रेल्वे थांबणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 non reserved railway for six December

फोटो गॅलरी