डाळींबाने भरलेला ट्रक मध्येच केला लंपास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

- सांगोल्यातील उत्पादकांची आठ लाखाहून अधिकची फसवणूक 

- 19 टन 470 किलो डाळिंब 

- ट्रकचालक जावेद हा उत्तर प्रदेशातील 

- सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगोला (सोलापूर) : मालट्रक चालकाने आठ व्यापाऱ्यांकडून जमा केलेले 19 टन 470 किलो डाळिंब ठरलेल्या ठिकाणी न पोचविता मुद्दाम लबाडीने लंपास करून आठ लाख 76 हजार रुपयांची व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याची घटना घडली. 

हे ही वाचा... वडगाव गुप्ता शिवारात जलसमृद्धी

बंडू विष्णू बनकर (रा. सांगोला) हे अनेक वर्षांपासून सांगोला येथे डाळिंब वाहतुकीसाठी व्यापाऱ्यांना मालवाहतूक ट्रक पुरवितात. शनिवारी (ता. 23) बंडू बनकर यांनी नेहमीप्रमाणे सांगोला मार्केट यार्ड येथून मालट्रक (यूपी 78 सीटी 6703) डाळिंब वाहतूक करण्यासाठी आणला. त्यांनी बापू गोडसे, सचिन चव्हाण, राजन, शहजाद खान, राहुल येलपले, आर. बी. एस., मिनाजभाई (सर्व रा. सांगोला) या आठ व्यापाऱ्यांकडून जमा केलेले 19 हजार 470 किलो म्हणजे सुमारे आठ लाख 76 हजार 150 रुपये किमतीचे डाळिंबाचे बॉक्‍स भरले होते. 

कालकुपी ः सोलापुरातील पहिले सर्वजनिक वाचनालय - 1853

ट्रकचालक जावेद (रा. उत्तर प्रदेश) हा ट्रक आर. के. फ्रूट कं. मुजफ्फरपूर (बिहार) येथे घेऊन जाणे अपेक्षित होते. परंतु, त्याने कोणतीही सूचना न करता, मुद्दाम लबाडीने डाळिंबाने भरलेला ट्रक ठरवून दिलेल्या ठिकाणी न पोचविता फसवणूक केली. जावेदचा मोबाईल लागत नसल्याने दोन दिवस वाट पाहून शुक्रवारी (ता. 29) सांगोला पोलिसात जावेद (रा. उत्तर प्रदेश) विरुद्ध बंडू विष्णू बनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सांगोला पोलिस करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate tracks Inches are lumps