कऱ्हाडमध्ये 125 ब्लॅकस्पॉटवर सीसीटिव्ही कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

कऱ्हाड : शहरातील वेगवेगळ्या 125 ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. शहरातील अपघात होणाऱ्या सुमारे वीसपेक्षाही जास्त ब्लॅक स्पॉटसह शहरातील व हद्दवाढ भागातील वर्दळीच्या ठिकाणांचाही त्यात समावेश आहे. शहरात सध्या 41 सी सी टिव्हीचे कॅमेरे आहेत. त्यात आणखी 125 कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. त्यासाठी सुमारे तीस लाखाच्या आसपास आर्थिक तरतूद करावी लागमार आहे. काही भागात गरज भासल्यास तेथे कॅमेरे बसवण्याचे पालिकेचे धोरण आहे. 

शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याबाबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतूदीसाठीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर तो विषय मासिक बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे. कॅमेरे बसवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबलचा खर्च टाळण्यासाठी स्थानिक टिव्हीसाठी देणाऱ्या केबलचा वापर करण्या बाबातही पालिका विचार करते आहे. त्याचीही नुकत्याच एका बैठकीत चर्च झाली आहे. त्यासह शहराच्या मुख्य बाजारपेठेशिवाय वर्दळीच्या ठिकाणीही कॅमेर बसवले जाणार आहे. त्यासाठी सुमारे तीस लाखांच्या आसपास खर्च अपेक्षीत आहे.

हद्दवाढ झालेल्या अऩेक भागात सिसीटिव्हीची गरज आहे. तेेथेही ते कॅमेरे बसवले जातील. पोलिसांनी काही ठिकाण सुचवली आहे. त्या ठिकाणांचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. सातत्याने अपघात होणारी वीसहून अधिक ब्लॅक स्पॉट पोलिसांनी सुचवले आहेत. त्या ठिकाणीही कॅमेर बसवण्यात येणार आहेत. त्याशिवाय शहरातील हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी लहान मोठ्या चोऱ्या होत आहेत. तेथे कॅमेरे असावेत, असे पोलिसांमनी पत्र दिले आहे. काही संवदेनशील ठिकाण शहरात आहे. तेथेही चांगल्या क्वालीटीचे कॅमेर असावेत, यासाठीही पोलिसांनी पत्र दिले आहे. त्यानुसार तेथेही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला आङे. कॅमेरे बसवण्यासाठी एक बैठक झाली आहे. त्याच्या आर्थिक तरतूदीचा अहवालही पूर्णत्वास आला आहे. त्यामुळे तो विषय पालिकेच्या मासिक बैठकीत मंजूर करून घेण्यात येणार आहे.  

Web Title: 125 cameras on black spot of karhad