तिजोरीत 15 दिवसांत 13 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी कर भरण्याची सुविधा महापालिकेने दिल्यापासून 15 दिवसांतच पालिकेच्या तिजोरीत 13 कोटींचा भरणा झाला. आज कर भरण्याचा अखेरचा दिवस आहे, असे जाहीर केल्यामुळे दिवसातच सुमारे 1 कोटी 31 लाख जमा झाले.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. सरकारने यातून दिलासा देण्यासाठी शासकीय आणि निमशासकीय कर जुन्या नोटांद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे महापालिकेत हळूहळू कराचा भरणा होण्यासाठी गर्दी होऊ लागली. पंधरा दिवसांत 13 कोटी रुपयांचा भरणा महापालिकेत झाला. आज एकाच दिवशी सुमारे 1 कोटी 31 लाख रुपये जमा झाले. घरफाळा विभागाने सुमारे साडेपाच कोटी रुपये मिळविले. परवाना विभाग, पाणीपुरवठा विभाग, इस्टेट विभाग, स्थानिक संस्था कर या करांपोटीही रकमा झाल्या आहेत. आज अखेरचा दिवस आहे, असे जाहीर केले होते. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत कर भरणा केंद्रे सुरू होती. महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयांत तसेच मुख्य इमारतीमध्येही कर भरण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत कर भरण्याचे हे काम सुरू होते.

Web Title: 13 million in 15 days