सांगली जिल्ह्यात महावितरणकडून 130 कोटींची वसुली; 4014 वीज जोडण्या तोडल्या 

130 crore recovery from Sangli MSEDCL; 4014 power outages
130 crore recovery from Sangli MSEDCL; 4014 power outages

सांगली : थकबाकीमुळे आर्थिक अडचणीकडे वाटचाल करणाऱ्या महावितरण कंपनीने काही दिवसांपूर्वी थकबाकीदारांची वीज जोडण्यात तोडण्यास सुरवात केली. तसेच वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली. त्याचा परिणाम म्हणून थकबाकी वसुली होऊ लागली आहे. जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक अशा 1 लाख 64 हजार 991 ग्राहकांनी 129 कोटी 28 लाख रुपयांचा भरणा केला. अद्यापही 105 कोटींची थकबाकी कायम आहे. 


गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वीज बिलांचे वाचन आणि बिल वाटप, तसेच भरणा केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर जून महिन्यात एकदम तीन महिन्यांच्या वीज बिलांचे वाटप करण्यात आले. ही बिले वाढीव होती. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरणा करण्यास नकार दिला. तसेच कोरोनाच्या काळातील वीज बिले माफ करावीत यासाठी काही राजकीय पक्ष, संघटना आदींनी चळवळ सुरू केली. त्याचाही परिणाम वसुलीवर झाला. गतवर्षी एप्रिलपासून वीज बिले थकीत ठेवणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली.

महावितरण कंपनीने वीज बिले योग्य असल्याबाबत जनजागृती करून वसुलीसाठी आवाहन केले. तसेच ऑनलाईन बिले भरण्याचा पर्याय ठेवला. 
वीज बिले थकीत ठेवणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढतच गेल्यामुळे महावितरण कंपनीसमोर आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे जादा थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास सुरवात केली. त्यामुळे थकबाकीदारांसह काही राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला. तसेच वीज बिले माफ करण्यासाठी आंदोलन केले. महावितरणने जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत थकबाकीदारांच्या वीज जोडण्या तोडण्यास सुरवात केली. आजवर एकूण 4014 ग्राहकांचे कनेक्‍शन कट केले आहे. 


जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीपर्यंत घरगुती 1 लाख 78 हजार 301 ग्राहकांकडे 113 कोटी रुपये, वाणिज्य 14 हजार 721 ग्राहकांकडे 21.94 कोटी रुपये आणि औद्योगिक 2407 ग्राहकांकडे 12.28 कोटी रुपये अशी एकूण 147 कोटी रुपये थकबाकी होती. थकबाकीचे आकडे वाढतच चालले आहेत, तर दुसरीकडे वसुलीची मोहीमही सुरू आहे. गेल्या काही दिवसांत 129 कोटी 28 लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात आली आहे. त्यानंतरही 105 कोटींची थकबाकी दिसून येत आहे. 

कनेक्‍शन "कट' 

  •  घरगुती : 3640 
  •  वाणिज्य : 322 
  •  औद्योगिक : 52 
  •  एकूण : 4014 


वसुलीही जोरात 

वीज ग्राहक प्रकार संख्या वसुली (कोटी रु.) 
घरगुती ग्राहक 1,48,454 96 
वाणिज्य ग्राहक 14,721 21.94
औद्योगिक 2311 11.98
एकूण 1,64,991 129.28 


सध्याची थकबाकी

वीज ग्राहक प्रकार संख्या थकबाकी (कोटी रु.)
घरगुती 2,8000 79 
वाणिज्य 25,000 14 
औद्योगिक 4000 12


संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com